दलितवस्तीच्या निधीला भाजप काँग्रेसच्या असमन्वयाचा फटका

0
7

मार्चच्या पहिला आठवडा लोटूनही दलितवस्तीचा निधी पडून
दलित वस्तीच्या कांमाना अद्यापही मंजुरी नाही
१० कोटीच्या मागणीत सव्वा आठ कोटी मिळाले,प्रस्ताव मात्र २५ कोटी
खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.०४-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री गोंदिया जिल्ह्याचे म्हटल्यावर या जिल्ह्यावर त्यांचे प्रेम अधिक राहायलाच पाहिजे,त्यात काही शंका नाही.परंतु पाठविलेला निधीच जर राजकारणाच्या कात्रीत अडकून बसत असेल आणि तो मार्च महिना लागूनही त्याचे प्रस्ताव मंजुर होत नसतील तर त्यास काय म्हणावे. अशी परिस्थिती सध्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामध्ये झाली आहे. त्यातच या जिल्हा परिषदेत भाजप आणि काँग्रेसची सत्ता जे दोन्ही राज्यात विरोधी पक्ष आहेत.ते येथे मिळून सत्ता उपभोगत आहेत, या दोन्ही पक्षामध्ये सुध्दा असमन्वयाचा मुद्दा समोर आला आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने दलित वस्ती योजनेंतर्गत सुमारे १० कोटीची मागणी सरकारकडे केली होती.परंतु जिल्हा परिषदतेतील सरकार बदलले आणि कामाच्या मागणीची यादी वाढतच चालली.या कामाच्या यादीनुसार सुमारे २५ कोटी रुपयाच्या कामाची मागणी जिल्हा परिषद सदस्यासंह ग्रामपंचायत व इतर यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.त्यामुळेच कुठल्या जिल्हा परिषद सदस्यांची नावे कमी करावी आणि कुठल्या राजकीय पक्षाने त्याचा अधिक लाभ व्हावा या भांडणातच ही यादी खरी तर अडगळीत पडून राहीली.त्यातच सरकारने गेल्या दीड दोन महिन्यापुर्वीच जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला मागणीच्या तुलनेत सुमारे ८.१३ कोटीच्या जवळपासचा निधी दिला आहे. हा निधी येऊनही त्या निधीला वाटप करण्याचे काम समाजकल्याण विभागाचे सभापती देवराज वडगाये करु शकले नाही.

वास्तविक त्यांचा राजकीय अनुभव सुध्दा यात अपयशी ठरला.कारण ते पहिल्यांदाच निवडून आले आणि सभापती झाले.तसेही त्यांना राजकीय ज्ञान कमीच असल्याचे एका उदाहरणावरुन स्पष्ट जाणवले ते सुध्दा म्हणजे त्यांनी ज्यांच्याकडून समाजकल्याण सभापतीची सुत्रे स्विकारली ते कुसनजी घासले सुध्दा भाजपचेच होते.परंतु त्यांना आणि त्यांच्या आधीचे समाजकल्याण सभापती श्रावण राणा यांंना सत्तेवर बसताच गेल्या अडीच वर्षात तुम्ही सायकल व शिलाई मशीनचे पैसे खर्च करु शकले नाही तर कशाचे सभापती होते अशा स्पष्ट शब्दात या नवख्या सभापतीने त्यांची हिनवणी आपल्याच कक्षात केली होती.परंतु घासले आणि राणा हे साधे स्वभावाचे त्यांनीही तुम्ही सभापती झालात आत्ता बघा कसे काम होते हे तुम्हाला लवकरच कळेल असे सांगितले.

विशेष म्हणजे राणा आणि घासले यांना राजकारणाचा अनुभव तरी होता परंतु अनुभव नसताना अचानक संधी मिळाली आणि सभापती पद मिळाल्यामूळ वडगाये साहेबांना त्यावेळी आपणच हुशार असे वाटले असावे.पण ती हुशारकी मात्र या दलीत वस्ती योजनेच्या कामाच्या वाटपातून बाहेर निघाली.आजही या कामाची यादी मंजुर होऊ शकली नाही.आणि जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोडा स्थायी समितीपर्यंत मार्च महिन्याचा पहिला आठवडा लोटूनही पोचू शकली नाही यावरुन समाजकल्याण सभापती किती सक्रिय आहेत qकवा त्यांच्या कामाची गती किती ती्रव आहे हे दिसून आले आहे.
दरम्यान बेरार टाईम्सने त्यांच्याशी या निधीसंदर्भात भ्रमणध्वनीद्वारे विचारणा केली असता कामांची यादी मोठी झाल्याने उशीर होत असल्याचे सांगत मार्च महिन्याच्या आधीच हा निधी आम्ही खर्च करुन दाखवू असे सांगत लवकरच विषङ्म समिती सोबतच स्थायी व सर्वसाधारण सभेत मंजुर होईल असेही समाजकल्याण सभापती वडगाये म्हणाले.

समाजकल्याण अधिकारी श्री रामटेके यांना याबाबत विचारणा करण्यासाठी संपर्क केला असता त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक ९९७५९५६०८० बंद असल्याने त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.कारण ते कार्यालयात हजर नव्हते.

यासंदर्भातच जि.प.अध्यक्षा उषा मेंढे यांना विचारणा करण्यात आली असता विषय समितींने कामांना मंजुरी दिली आहे.त्या कामांला येत्या १० तारखेला विशेष सर्वसाधारण सभा घेऊन मंजुरी देण्यासाठी प्रयत्न सुरु असून कुठलाही निधी शासनाला परत जाऊ न देता तो मार्च महिन्यातच खर्च होईल याची काळजी घेण्यात येत असल्याची माहिती दिली.