गाडगेबाबा चौकाचे नामकरण संपन्न

0
13

यवतमाळ,दि.22ः-. मानवतावादी संत संत गाडगेबाबा यांची विचारधारा जन माणसापर्यंत पोहोचली पाहिजे .त्यांनी केलेला प्रत्येक काम हे विज्ञानवादी होतं .अंधश्रद्धेला मूठ माती देणार होतं .माणसाच्या मेंदूला जागिण्यासाठी, त्याच्या मेंदूतून चुकीच्या असलेल्या संकल्पना बाहेर काढणे.आणि त्याला विज्ञानवादी बनवणे, मानवतावादी बनवणे ,कुटुंबासोबत कसे वागावे, या पद्धतीचे कीर्तन सातत्याने गाडगेबाबा यांनी केलेले आहे.त्या गाडगे बाबाच्या विचारधारेची माहिती ,त्यांनी दिलेल्या दशसूत्रीच्या आधारे निर्माण झालेली आहे.तीच दशसूत्री घेऊन यवतमाळ मध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या घराच्या जवळ गाडगेबाबा चौकाचे नामकरण केल्या गेलेले आहे. संत गाडगेबाबा विचार मंचाच्या वतीने नरेंद्र भासपाले. सुभाष शिरसागर. संजय धोंगडे. अभय राजे पापळकर. विजय राजे मालखेडे. गोलू मिराशे. लक्ष्मण शेंद्रे. गजानन भासपाले. संजय मोकळकर विजय नेरकर, युवा उद्योजक डा. प्रशांत सावरकर आदी उपस्थित होते.