कारंजा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारतीची दुरावस्था

0
22

गोंदिया-शहरालगतच्या कारंजा येथे जिल्हा परिषद अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ आहे. या दवाखान्याची इमारतीचे बांधकाम सन २0१५ मध्ये झाले होते. मात्र, अवघ्या काही वर्षातच या इमारतीचे बारा वाजले. आजघडीला र्जजर अवस्थेत आलेली ही इमारत मोठय़ा अपघाताला आमंत्रण देत आहे. या दवाखान्यात कार्यरत अधिकारी, कर्मचारी जीव मुठीत घेऊन सेवा पुरवित आहेत. यामुळे जिल्हा परिषदेला जाग केव्हा येणार, असा सवाल कारंजा वासीयांकडून उपस्थित केला जात आहे.
पशुधनाच्या आरोग्याची काळजी स्थानिक स्तरावर घेता यावी, या उद्देशाने ठिकठिकाणी जिल्हा परिषदेकडून पशु दवाखाने उभारण्यात आले आहे. कारंजा येथील श्रेणी-१ च्या पशू वैद्यकीय दवाखान्याची इमारतीचे बांधकाम सन २0१५ मध्ये करण्यात आले. या इमारतीचे लोकार्पण तत्कालीन पालकमंत्री बडोले व माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. दरम्यान, इमारतीचे बांधकाम दर्जेदार असल्याचे चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, अवघ्या काही वर्षातच दजेर्दार कामाचे पितळ उघडे पळू लागले.
या इमारतीचे स्लॅब खचू लागले आहे. टाईल्स पुर्णत: फुटल्या आहेत. एवढेच नव्हेतर एकंदरित ही इमारत र्जजर अवस्थेत आली आहे. असे असतांनाही या दवाखान्यात कार्यरत कर्मचारी जीव मुठीत घेऊन सेवा पुरवित आहेत. र्जजर अवस्थेत आलेली पशू वैद्यकीय दवाखान्याची इमारत उघडपणे मोठय़ा अपघाताला आमंत्रण देत आहे. असे असतांनाही जिल्हा परिषदेचे बांधकाम व पशुसंवर्धन विभाग याकडे डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन मोठय़ा अपघाताची प्रतिक्षा करीत आहे का? असा सवाल कारंजावासीयांकडून उपस्थित केला जात आहे.