मंदिर पाडल्यावरून खमारीत तणाव

0
10

गोंदिया : नजीकच्या खमारी येथील शिवमंदिर पाडण्यात आल्यावरून गावात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. या घटनेला घेऊन विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलने शासनाचा निषेध व्यक्त करीत गोंदिया-देवरी राज्य महामार्गावर रस्ता रोको केला. दरम्यान तहसीलदार व उप विभागीय पोलीस अधिकार्‍यांनी समजूत घातल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 
ऐन होळीच्या एका दिवसापूर्वी जवळील ग्राम खमारी येथे असलेले महाकालेश्‍वर मंदिर प्रशासनाने मंदिर नियमिती कार्यक्रमांतर्गत जेसीबी चालवून पाडले. तर या मंदिरातील शंकराची पिंड व नंदिची मूर्तीगावातील राम मंदिरात जाऊन ठेवण्यात आली. मंगळवारी (दि.२२) दुपारी २.३0 वाजतादरम्यान घडलेल्या या घटनेबाबत विहिप व बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळ गाठून या घटनेचा निषेध नोंदविला. तसेच शासना विरोधात नारेबाजी करीत राज्यमहामार्गावर सायंकाळी ६ वाजतादरम्यान रास्ता रोको केला.