अधिकारी आणि राइसमील मालकांचे साटेलोटे

0
13

खेमेंद्र कटरे,गोंदिया– एकाधिकार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र मार्केqटग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या शेतकèयांच्या धानाची भरडाई ही त्याच जिल्ह्यात करण्यात यावी, असा शासननिर्णय आहे. मात्र, शासनाच्या निर्णयाला चक्क अधिकाèयांनीच बगल देत आणि राइसमील मालकांशी ‘यारानाङ्क करून बिनदिक्कत धानाची विल्हेवाट दुसèया जिल्ह्यात लावली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. परिणामी, अस्सल धान खुल्या बाजारात तर निकृष्ठ तांदूळ शासकीय गोदामात येत असल्याचे राज्याचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतातरी राज्य सरकार या गब्बर व्यापाèयांवर अंकुश लावून सरकारी जावयांवर काही कारवाई करणार की नाही? असा सवाल जनतेने केला आहे.
गेल्या शनिवारला सडक अर्जुनी बाजार समितीच्या खोबा नाक्यावर वडसा कडे जाणाèया ट्रक क्रमांक सीजी ०८ एल ०८०४ला पकडण्यात आले. या ट्रक मध्ये २० टन धान होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धान साकोली तालुक्यातील सातलवाडा येथील असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. ट्रकचालकाकडून कोणताही पुरावा नसल्याने ट्रक नाक्यावर अडवून सडक अर्जुनीचे तहसिलदार यांना कळविण्यात आले. यावर तहसिलदारांनी यासंदर्भात चौकशीसाठी नायब तहसिलदारांना पाठविले.१५ मार्च रोजी आदिवासी विकास महामंडळ नवेगावबांधअतंर्गच्या परसोडी केंद्रावरील ४८० पोती धान परजिल्ह्यात गेल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती सडक अर्जुनीच्या नाक्यावर फाडण्यात आलेल्या पावतीवरुन स्पष्ट झाले आहे. यासबंधी १६ मार्चच्या अंकात बेरारटाईम्सने सविस्तर वृत्त केले होते. त्या वृत्ताला दुजोरा देणारा प्रकार पुन्हा घडल्याने यावरुन या सर्व प्रकरणात आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी आणि भरडाईसाठी ज्या राईस मिलला धान देण्यात आले त्यामील मालकांमध्ये साटेलोटे असल्याचे स्पष्ट होते.कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोशन बडोले यांच्या माहितीनुसार, पूर्ण चौकशी केल्यानंतर सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी येथील आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेकडे असलेल्या धान खरेदी केंद्रावरील धान हे गोंदिया येथील श्री इंड्रस्टी एमआयडीसी गोंदियाला भरडाईसाठी आदिवासी विकास महामंडळाने डीओ क्रमांक ५६००८ नुसार दिले होते. त्यानुसार, या केंद्रावर धानाची उचल करण्यासाठी ट्रक क्रमांक एमएच ३४ एबी ०९८६ हे धान खरेदी केंद्रावर पोचले. तेव्हा बाजार समितीचे कर्मचारी नजर ठेऊन होते.ट्रकमध्ये ४८० पोती धान भरण्यात आल्यानंतर परसोडी येथील संस्थेला भंडारा येथील आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने वाहतुक परवाना क्रमांक ५६००८(डीओ)नुसार हे धान गोंदिया येथील श्री इंडस्ट्री एमआयडीसी गोंदियाला देण्यात आल्याची स्पष्ट नोंद आहे. असे असताना परसोडी येथील संस्थेने मात्र ट्रक चालकाच्या हाती दिलेल्या पावतीमधील वरच्या भागात खोडतोड असल्याचे बाजार समिती कर्मचारी यांच्या लक्षात आले. यामध्ये श्री इंड्रस्टी एमआयडीसी गोंदियाऐवजी देसाईगंज लिहिलेले होते. त्यामुळे खोबा नाक्यावरुन या ट्रकची नोंद करुन सोडण्यात आले.ट्रक गेल्यानंतर मात्र हा ट्रक देसाईगंजला जाऊ शकतच नाही, हे लक्षात आले. तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. बडोले यांच्यानुसार, आदिवासी विकास महामंडळ भंडाराचे व्यवस्थापक राजुरकर यांनी याप्रकरणाची भ्रमणध्वनीद्वारे माहिती देण्यात आली. परंतु, त्यांनीही त्याकडे कानाडोळा करीत असे शक्य नसल्याचे सांगत आपली बाजू झटकल्याचे बडोले यांनी सांगितले.