महाशिवरात्री यात्रेनिमित्त माजी मंत्री राजकुमार बडोलेनी केली प्रतापगडची पाहणी

0
14

अर्जुनी मोर.दि.16 :-तालुक्यातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र असलेल्या प्रतापगड येथे 18 फेब्रुवारी पासुन महाशिवरात्रीनिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात येते. पाच दिवस चालणा-या या यात्रेत विदर्भातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात.भाविकांची यात्रा सुलभ व्हावी,या दृष्टीने माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी प्रतापगड येथे भेट देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी महादेव मंदिर परिसर व मुस्लीम दर्गा परिसराला भेट दिली. व दोन्ही तिर्थस्थानाच्या प्रतिनीधी सोबत चर्चा केली.
हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे प्रतापगड हे तिर्थक्षेत्र अर्जुनी मोर तालुक्यातील आदिवासी अतीदुर्गम भागात वसलेले निसर्गरम्य तिर्थक्षेत्र, येथे दरवर्षी महाशिवरात्रीला हिंदु मुस्लिम एकतेची यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत मनोभावे व शांततेने पार पडते.या दोन्ही तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी व सुविधा पुरविण्यासाठी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी लाखो रुपयाचा निधी आपल्या कार्यकाळात देवुन ब-याचशा सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. हे विशेष.यात्रेसाठी येणा-या भाविकांना रस्त्याची व्यवस्था, पिण्याचे शुध्द पाणी, व इतर व्यवस्थेची पहाणी माजी मंत्री यांनी केली.त्यांचे सोबत बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता निमजे,शाखा अभियंता संजय शहारे,सरपंच भोजराज लोगडे, मुस्लिम दर्ग्याचे पदाधिकारी व अन्य अधिकारी व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व पदाधिकारी यांना आवश्यक त्या सुचना केल्या.