‘व्हाटसअॅप’वरून करा तक्रार

0
9

नागपूर-ऑनलाईन एफआयआर नंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरुद्ध तक्रार करण्यासाठी व्हाटसअॅप नंबर जारी केला आहे.९९३०९९७७०० या क्रमांकावर व्हाटसअॅप द्वारे नागरिक लाचखोरांविषयी आपली तक्रार नोंदवू शकतात. कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी अधिकारी , कर्मचारी किंवा खासगी व्यक्ती लाचेची मागणी करत असल्यास तक्रारदार ०९९३०९९७७०० या व्हाटसअॅप नंबरच्या सहायाने आपली तक्रार नोंदवू शकतात. घरोघरी पोहचलेल्या मोबाईल व इंटरनेटच्या मदतीने आता भ्रष्टाचार कमी करण्यास यामुळे मदत मिळू शकते.

नागपूर पोलीस विभागाद्वारे वेगवेगळ्या हेल्पलाईनची सुरुवात करण्यात आली ज्यानंतर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देखील व्हाटसअॅप हेल्पलाईनची सुरुवात केली आहे. या नंबरमुळे जनतेला आपल्या मोबाईलद्वारे भ्रष्टाचारसंदर्भात विनामूल्य तक्रार करता येईल.कुणी लाचेची मागणी करीत असल्यास कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन एसीबी नागपूरचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केलं आहे