गोरेगावात ओबीसी कृती समितीची बैठक उत्साहात

0
5

गोरेगाव,दि.01- गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने जिल्ह्याव्यापी बैठकांचे आयोजन करण्यात आले असून गोरेगाव येथे आज शनिवारला बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या गोरेगाव तालुका ओबीसी संघर्ष कृती समितीच्या बैठकित ओबीसी समाजाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.त्याचप्रमाणे ओबीसीवर अन्याय करणाया सरकारविरुध्द लढा तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.सभेला ओबीसी संघर्ष कृती समितीचे अमर वराडे,रेखलाल टेंभरे,डाॅ.सजिंव रहागंडाले,सावन कटरे,नंदकिशोर कटरे,ओमप्रकाश कटरे,लोकेश कावळे,कमलेश बारेवार,नंदकिशोर कटरे,विजय बारेवार,दिलीप चव्हाण, राहुल कटरे,वामनभाऊ वरवाडे,डाॅ.विवेक मेंढे,इंजि.गोविंद बघेले,डेमेंद्र रहागंडाले,शसेंद्रकुमार भगत आदी मान्यवर उपस्थित होते.