विदर्भस्तरीय ओबीसी संघटनांची रविवारला नागपूरात बैठक

0
12
गोंदिया-विदर्भातील सर्व ओबीसी संघटना,म‘हात्मा फुले समता परिषद,बहुजन संघर्ष समिती,ओबीसी एकता मंच,ओबीसी राष्ट्रीर्य मुक्ती मोर्चा वतीने  ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यावर तसेच सामाजिक न्यायमंत्री यांनी काढलेल्या व्यक्तव्यावर चर्चा करण्ङ्मासाठी नागपूर येथे विदर्भस्तरीय सर्व ओबीसी संघटनाची बैठक उद्या रविवार ३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता धनवटे नॅशनल कॉलेज ,अजनी नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकिला विदर्भातील सर्वच ओबीसी संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते,समाज संघटनाप्रमुख,लोकप्रतिनिधी,अधिकारी ,कर्मचारी व विद्याथ्र्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ओबीसी समाजातील नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधी व चळवळीतील सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन चंद्रपूर कृती समितीचे सयोंजक सचिन राजुरकर,बबनराव फंड,राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोच्र्याचे सयोजक नितीन चौधरी,गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे अमर वराडे,बबलू कटरे,मनोज मेंढे, खेमेद्र कटरे ,राजेश नागरीकर,आशिष नागपूरे,कैलाश भेलावे,उध्दव मेहंदळे,कृष्ण ब्राम्हणकर,विनायक येडेवार,उमेंद्र भेलावे,प्रभाकर दोनोडे,धन्नालाल नागरीकर,रेखलाल टेंभरे, ओबीसी सेवा संघाचे बी.एम.करमरकर,सावन कटरे,संतोष खोब्रागडे,प्रा. रामलाल गहाणे,कृपाल लांजेवार,महात्मा फुले समता परिषदेचे विदर्भ संघटक प्रा.दिवाकर गमे,ओबीसी छावा संग्राम परिषदेचे राजीव ठकरेले,गडचिरोली ओबीसी अधिकारी,कर्मचारी संघटनेचे प्रा.शेषराव येलेकर, विलास काळे यवतमाळ, नागपूर ओबीसी संघटनेचे पांडुरंग काकडे,प्रा.शरद वानखेडे,गोंविद वरवाडे, नामदेवराव जेंगठे,श्याम झाडे बहुजन संघर्ष समिती,ओबीसी एकता मंच आदी संघटनांनी केले आहे.