ओबीसी कृती समितीचे सामाजिक न्यायमंत्र्याच्या विरोधात चंद्रपूरात धरणे आंदोलन

0
15

चंद्रपूर,दि.07- येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २८ मार्च रोजी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी ओबीसी समाजाबद्दल  गोदियात केलेल्या अपमानजनक शब्दांचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच त्यांना मंत्रीमंडळातून बरखास्त करण्याच्या मागणीला घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी कृती समितीच्यावतीने धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील मागण्यात सामाजिक न्याय मंत्री यांना मंत्रीमंडळातुन हटविण्यात यावे,ओबीसी जनगणणेची आकडेवारी जाहीर करून लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटमध्ये तरतुद करण्यात यावी. ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करून घटनेच्या ३४० व्या कलमानुसार शेड्युल तयार करण्यात यावे.नॉन क्रिमिलेअरची असंवैधानिक अट रद्द करण्यात यावी,भारत सरकारची मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती राज्यसरकारने १००० ट्क्के द्यावी,लोकेश येरणे या विदथ्याच्या आत्महत्येची सीआयडी चौकशी करण्यात यावी या मागण्यांचा समावेश होता.आंदोलनात ओबीसी कृती समितीचे सयोंजक सचिन राजुरकर,बबनराव फंड,प्रा.चापले,बबनराव वानखेडे,प्रा.माधव गुरुनुले,हिराचंद बोरकुटे,डी.के.आरीकर,राहुल पावडे,सुर्यभान झाडे यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.निवेदनाची प्रत माजी राज्यमंत्री आमजार विजय वड्डे़टीवार,आमदार नाना श्यामकुळे,संजय धोटे,बाळूभाऊ धानोरकर,बंट्टीभाऊ भांगडिया यांना देण्यात आली.