ओबीसी सेवा संघ व संघर्षकृती समितीच्यावतीने डाॅ.आंबेडकरजंयतीनिमित्त चर्चासत्र

0
17

गोंदिया-गोंदिया जिल्हा ओबीसी सेवा संघ व ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,तत्वज्ञानी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जंयती विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात साजरी करण्यात आली.यावेळी ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि.प्रदिप ढोबळे अध्यक्ष स्थानी होते.यावेळी बाबासाहेबांच्याविचारावर चर्चासत्राचे आयोजन करुन ओबीसीसमाजासाठी केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली.तसेच बाबासाहेबानी दिलेल्या 340 व्या कलमाच्या आधारेच गोंदिया जिल्हयात गेल्या काही वर्षापासून ओबीसी समाजात जनजागृतीचे कार्य सुरु असल्याचे विचार इंजि.ढोबळे यानी व्यक्त केले.बाबासाहेब हे ओबीसी समाजाचे मार्गदर्शक असल्याने त्यांच्या तत्वावर चालून त्यांचे अनुयायी ओबीसी समाजाच्या संघटनेतून तयार करण्याचे काम करीत असतानाच ओबीसीच्या न्याय हक्कासाठी बाबासाहेबांनी करुन दिलेल्या घटनात्मक तरतुदींचा अधिकार सामाजिक न्याय मंत्रालयाकडे मागणे आपला अधिकार असल्याचे यावेळी त्यांनी विचार मांडले.यावेळी ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बी.एम.करमरकर,ओबीसी संघर्ष कृती समितीचे कार्याध्यक्ष अमर वराडे,सचिव खेमेंद्र कटरे,ओबीसी सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष सावन कटरे,विनायक येडेवार,गुरुदास येडेवार,प्रा.संजय रहागंडाले,संतोष खोब्रागडे,पी.डी.चव्हाण,चंद्रकुमार बहेकार,आर.एन.बिसेन,श्री.बिसेन,तुरकर,प्रमोद भोयर,मनिष मुनेश्वर आदी उपस्थित होते.