वैद्यकीय महाविद्यालयाचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नामकरण

0
30

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल तसेच गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा करण्यात आली, तेव्हापासून या महाविद्यालयाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव देण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. परंतु, राज्य शासनाने याकडे काणाडोळा केल्याने अखेर  आज गुरुवारला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसने सध्या सुरु असलेल्या जिल्हा रुग्णालय परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयच्या प्रवेशद्वारावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या नामफलकाचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी केले. यावेळी आमदार राजेंद्र जैन, माजी नगराध्यक्ष सुशीला भालेराव, माजी आमदार दिलीप बनसोड,मनोहर चंद्रिकापुरे आदी उपस्थित होते. रेलटोली स्थित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्यी वतीने रॅली काढण्यात आली. या रॅलीत प्रफुल पटेल,राजेंद्र जैन , दिलीप बन्सोड, के.बी.चव्हाण, विनोद हरिणखेडे, मनोहर चंद्रिकापुरे, गंगाधर परशुरामकर,अविनाश काशीवार,राजेश भक्तवर्ती,बबलू कटरे,राजेश गुणेरिङ्मा, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, देवेंद्रनाथ चौबे, महेश जैन, पंचम बिसेन, राजलक्ष्मी तुरकर, शिव शर्मा, कुंदन कटारे, प्रभाकर दोनोडे,  छोटू पटले, जितेश टेंभरे, राजेश चौव्हाण, छाया चौव्हाण, खुशबू टेंभरे, प्रेम रहांगडाले,  उषा किंदरले, देवचंद तरोणे, दुर्गा तिराले, रजनी गौतम, सुशीला भालेराव, कैलाश पटले, सुरेश हर्षे, केतन तुरकर, जियालाल पंधरे, प्रीती रा‘टेके आदी सहभागी झाले