अर्जुनी मोरगाव येथे कापड दुकानाला आग

0
7

मोठा अनर्थ टळला, लाखावर नुकसान

अर्जुनी मोरगाव,दि.७ – शहरातील आनंद वस्त्रालय या प्रतिष्ठानाला आज (७) दुपारी तीन वाजता दरम्यान अचानक आग लागली. चार मजली या वास्तूला लागलेल्या आगीमुळे लाखावर नुकसान झाले. मात्र मोठा अनर्थ टळला
प्राप्त माहितीनुसार, शहराच्या मुख्य रस्त्यावरील आनंद वस्त्रालय या दुकानला आज अचानक आग लागल्याची घटना घडली.या मार्गाने जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराला आग लागल्याचे लक्षात आले.त्याने आरडाओरडा केली.लगेच परिसरातील सगळे व्यावसायिक गोळा झाले. त्यावेळी एकच खडबड माजली होती. सदर वास्तू चार मजली असल्यामुळे काय करावे कुणालाच सुचेनासे झाले.आगीची माहिती मिळतात नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाची चमू घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आली. या दुर्घटनेत प्रतिष्ठान चालकाने २० ते २२ लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली.चौथ्या माड्यावर लागलेली ही आग नेमकी कशी लागली हे कारण अद्याप कळू शकले नाही.चौथ्या माळ्यावर सहा डकटीण कुलर,दोन मोठे मोटार आणि सोलार यंत्र बसविले आहे.यामध्ये सहाही डक्टींग कुलर,दोन्ही मोटार पूर्णतः जळून खाक झाले. सोलार संयंत्र अर्ध्यावर जळून खाक झाले.ही आग चौथ्या माड्यावरून तिसऱ्या माड्यापर्यंत डकटिंग पाईपलाईन द्वारे खाली पोहोचली होती.मात्र दुकानाच्या आत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही.या दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी घडली नाही. अग्निशमन दलाचे निखिल शहारे,सुरेश बोरीकर, दुर्योधन नेवारे,धनंजय काळबांधे यांच्या चमूने आग आटोक्यात आणण्यासाठी पर्यंत केले.