भंडारा झेडपी सीईओची शिक्षकाला शिविगाळ

0
13

भंडारा-भंडारा जिल्हा परिषदेंतर्गत येत असलेल्या शिक्षण विभागातील समस्याना घेऊन गेलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळालाच भंडारा जिल्हा परिषदेचे सीईओ राजेश निबांळकर यांनी अश्लिल शिविगाळ केल्याने भंडाराच नव्हे तर विदर्भातील शिक्षक संघटनामध्ये मोठा रोष उफाळून आला आहे.शिक्षक परिषदेचे अध्यक्ष मंगेश बहेलपांडे यांच्यासोबत सुभाष गरपडे आणि तीन ते चार शिक्षक सीईओ यांच्या कक्षात गेले.त्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन त्यांना दिले असता त्यांनी तिथेच हजर असलेले शिक्षणाधिकारी शेंडे यांच्याकडे ते निवेदन फेकून दिले.त्यावर शिक्षकांनी मा.न्यायालयाने बदली संदर्भात आदेश दिले आहेत.सोबतच विभागीय आयुक्तांनी सुध्दा स्मरणपत्र दिले आहेत.तरीपण आपण न्यायालयाच्या आदेशाचे का पालन करीत नाही असे शिक्षणाधिकारी यांना विचारले असता त्यांनी आम्ही न्यायालयाची अवमानना झाली तरी चालेल पण तुझ्या पत्नीला रुजू करुन घेणार नाही.न्यायालयाला काय उत्तर द्यायचे ते देऊ असे म्हटल्याचे गरफडे यांनी सांगितले.त्यांनतर आपण सीईओ निबांळकर यांना विनंती केली असता त्यांनी हरामखोर……आदी अश्लिल शब्दचा वापर करुन कक्षातून निधून जा असे म्हटल्याने शिक्षकांत मोठा रोष निर्माण झाला आहे.यातच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने आज जि.प.समोर आंदोलन करुन या घटनेचा निषेध नोंदविला.त्यावर शिक्षणाधिकारी यांनी काही अधिकारी असे बोलतात त्यांची सवय असते असे उत्तर दिल्याचे गरफडे यांनी म्हटले आहे.