दहशत माजविणाèयांना अटक करा जिल्हाधिकाèयांना निवेदन

0
14

शिव शर्मा यांच्यावरील ३०७ कलम काढण्याची मागणी
गोंदिया : आ. गोपालदास अग्रवाल यांच्यावरील हल्ल्याचे निमित्त करून शहरात दहशत माजवून नागरिकांना वेठीस धरणाèयांना तातडीने अटक करण्यात यावे. तसेच नगरसेवक शिव शर्मा यांच्यावर लावलेले कलम ३०७ काढण्यात यावे, या मागणीचे निवेदन आज ६ मे रोजी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, येथील हॉटेल ग्रँड सिता येथे ९ एप्रिल रोजी नगरसेवक शिव शर्मा यांनी आ. अग्रवाल यांना थापड मारली. ही घटना निषेधार्थ आहे. परंतु, पोलिसांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचे कलम ३०७ लावले आहे. या घटनेच्या चित्रफितीत शिव शर्मा यांनी आ. अग्रवाल यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला नसल्याचे स्पष्टरित्या दिसते. त्यामुळे त्यांच्यावर कलम ३०७ लावने बळजबरी व गळचेपीचा प्रकार आहे. या प्रकरणी पोलीस राजकीय दबावात काम करीत असल्याचे निर्दशनास येत आहे. तरी शिव शर्मा यांच्यावर लावलेले कलम ३०७ काढण्यात यावे.
तसेच या घटनेनंतर आमदार पुत्र व त्यांच्या समर्थकांनी शहरात गैरकायद्याची मंडळी जमवून तोडफोड केली व दहशतीचे वातावरण निर्माण केले. यात अनेक व्यापाèयांचे व शासकीय मालमत्तेचे आर्थिक नुकसान झाले. मात्र, याप्रकरणी गुन्हेगारांना अद्यापही अटक करण्यात आली नाही. या गुन्हेगारांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतांना, भाजपा  माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, न. प. उपाध्यक्ष हर्षपाल रंगारी, न. प. सभापती बंटी पंचबुध्दे, भाजपा शहराध्यक्ष सुनिल केलनका, बजरंग दलाचे विदर्भ प्रांत संयोजक देवेश मिश्रा, शिवसेना उपप्रमुख सुनिल लांजेवार, मनोज मेंढे, संतोष चव्हाण, भाउराव उके, शिवसेना जिल्हा उपप्रमुख तेजराम मोरघडे, दिनेश दादरीवाल, घनश्याम पानतावने, दीपक कदम, भरत क्षत्रीय, भिकम शर्मा, प्रदिपqसग ठाकूर, संजय कुळकर्णी, जयंत शुक्ला, दीपक बोबडे, मनोहर आसवानी, संजय मुरकुटे, अमित झा, धमेंद्र डोहरे, सुरेश चंदनकर, अभय अग्रवाल, महेंद्र देशमुख, पंकज सोनवाने,अहमद मनियार, अजय शर्मा, रमेश करोसिया, छोटू रामटेककर, विनोद बनसोडे, कुशल अग्रवाल, मोन्या मडावी आदी उपस्थित होते.