लाईफ लाईनमध्ये ५५ मोतीबिंदू शस्त्रक्रिया

0
12

गोंदिया,दि.६ : जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांच्या सेवेसाठी दाखल झालेल्या लाईफ लाईन एक्सप्रेसमध्ये आज ६ मे रोजी पहिल्या दिवशी जिल्ह्यातील ५५ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या रुग्णांची पूर्व तपासणी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली. जवळपास ३५० च्या वर मोतीबिंदू झालेल्या रुग्णांनी शस्त्रक्रियेसाठी आपल्या नावांची नोंदणी केली आहे. भोपाळ येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.धर्मेंद्रसिंग व त्यांचे सहकारी डॉक्टर्स हे रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करीत आहे.