अग्रवालांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचा जंगी मोर्चा

0
10

गोंदिया, ता. ७ : जिल्ह्यात वाढत असलेले भूमाफिया, वाळू माफिया आणि गुंडा गर्दीला आळा घालण्यात राज्य सरकारला आलेले अपयश तसेच गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर पत्रकार परिषदेत हल्ला करणाèया आरोपीला अटक करण्यास करण्यात येणाèया टाळाटाळीच्या निषेधार्थ सर्व पक्षीय निषेध मोच्र्याने आज (ता. ७) गोंदिया शहर दुमदुमले होते. सर्कस ग्राऊंड येथून दुपारी दोन वाजता निघालेला हा मोर्चा स्टेडियम जवळील उपविभागीय कार्यालयासमोर जाहीर सभेत रुपांतरीत झाला. या मोच्र्यात गोंदिया जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने काँग्रेस-राष्ट्रवादी आरपीआय कवाडे गटाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोच्र्यात राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, माजीमंत्री नितीन राऊत, आमदार येशुमती ठाकूर, राजेंद्र जैन, विरेंद्र जगताप, आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आपल्या भाषणातून राज्य सरकारच्या भूमिकेवर टिका केली. राज्यातील फडणवीस सरकार ते आरोपींचे सरकार असून पोलिस प्रशासन आरोपींना पाठबळ देत असल्याचा आरोप यावेळी वक्त्यांनी केला आहे. गोंदिया जिल्ह्यातच नव्हे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते असलेल्या आणि विधानसभेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष असलेल्या आमदारावर पत्रकार परिषदेत भाजपच्या नगरसेवकाच्या वतीने हल्ला होत असेल आणि तो हल्ला करणारा आरोपी चार आठवड्यापासून फरार आहे. याचाच अर्थ या आरोपीला राज्यातील भाजप सरकार पाठीशी घालत आहे. अशा सरकारलाही खाली खेचण्याची वेळ आल्याचे वक्ते म्हणाले. या मोच्र्यामध्ये माजी आमदार भरत बहेकार, बंडू सावरबांधे, अनिल बावनकर, रामरतन राऊत, हरिहर पटेल, मधुकर कुकडे, नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, पुरुषोत्तम कटरे, जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, विनोद जैन, गंगाधर परशुरामकर, योगेंद्र भगत, अर्जुन नागपुरे, पी.जी. कटरे, राधेलाल पटले, जगदिश येरोला, रत्नदीप दहीवले, नटवरलाल गांधी, छोटूभाऊ पटले, देवेंद्रनाथ चौबे, जनकराज गुप्ता, विनायक खैरे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी आरपीआयचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
——————————–ो