आ.रहागंडालेच्या प्रयत्नाने बावनथडीतून ८.५एससीएम पाणी धापेवाडा योजनेत

0
14

गोंदिया : एप्रिल महिन्यातच कडक उन्हाळ्याच्या फटका बारमाही वाहणाèया वैनगंगा व बावनथडी नदीला पडला असून लातुर सारखी पाणी टंचाईची परिस्थिती तिरोडा तालुक्यात निर्माण होण्याची स्थिती येताच आमदार विजय रहागंडाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बावनथडी प्रकल्पातील पाणी वैनगंगा नदीमार्फेत धापेवडा योजनेत उपलब्ध करुन दिले आहे.महाराष्ट्र व मध्यप्रदेशात भाजपचेच सरकार असल्याने बावनथडीतील पाणी सोडण्यास अडचण निर्माण झाली नाही.पाणी टंचाई निर्माण होऊन रब्बी पिका करपू नये तसेच पिण्याची पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी आ.रहागंडाले यांनी आ.अनिल सोेले यांच्यासोबत मुख्यंमंत्री फडणवीस,जलसंपदा मंत्री गिरिश महाजन,मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजqसह चव्हाण,कृषी मंत्री गौरीशंकर बिसेन यांच्याशी चर्चा करुन समस्येची जाणीव करुन दिली.त्यानंतर गोंदिया,भंडारा व बालाघाट जिल्हाधिकारी तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाèयांनी चर्चा करुन पाणी सोडण्याची प्रकिया पुर्ण केल्यानतंर शनिवारला बावनथडीतून धापेवाड योजनेकरीता वैनगंगा नदीत पाणी सोडण्यात आले.हे पाणी ६५ किमीचा मार्ग पुर्ण करीत धापेवाड योजनेत ११ मे च्या सुमारास पोचण्याची शक्यता आहे. बावनथडी योजनेतून१२.५२९ टीएमसी पाण्याची गरज होती.त्यातून १.२४ टीएमसी पाणी रब्बी पिकाला ११ दिवस देण्यात येणार आहे.तर तिरोडा शहरात पिण्यासाठी ०.०५ टीएमसी पाणी १० जूनपर्यंत उपलब्ध होणार आहे.