हलबीटोल्यात पंचशीलध्वज फेकल्यावरून तणाव

0
10

कारवाई करण्यास पोलिसांची टाळाटाळ : पोलिस ठाण्यात महिला, पुरूषांची धडक
सालेकसा, दि १२ : नगरपंचायतीअंतर्गत हलबीटोला येथे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त लावलेला पंचशीलध्वज गावातील काही लोकांनी बुधवारी (दि. ११) रात्री उपटून ङ्केकला. यावरून गावात तणाव निर्माण झाला. अनुसूचित जातीवर बहिष्कार टाकण्यात आला. पोलिसात तक्रार करण्यात आली. मात्र पोलिस दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.
सालेकसानजिक असलेले हलबीटोला गाव अर्धनारेश्वर देवस्थानामुळे जिल्ह्यात नावरूपास आले. हे गाव एकूण १४९५ लोकसंख्येचे आहे. या गावात हलबी, पोवार, अनुसूचित जाती, म्हाली, कुणबी, ढिवर आदी जातींचे लोक गेल्या कित्येक वर्षांपासून गुण्या गोिवदाने राहतात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्याचा ठराव घेण्यात आला. १४ एप्रिल रोजी जयंती साजरी झाली. त्यात इतर समाजाचेही लोक सहभागी झाले. मात्र त्यानंतर गावातील काही सवर्ण समजणाèया आणि असामाजिक तत्त्वाच्या लोकांनी इतरांना भडकावले. १४ एप्रैल रोजी लावलेला पंचशीलध्वज बुधवारी (ता. ११) रात्री १२ वाजताच्या सुमारास काही लोकांनी उपटून फेकला. यावरून तणाव निर्माण झाला. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी दुखावले. त्यांनी सालेकसा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. एवढा ज्वलंत मुद्दा असताना पोलिस बघ्यांची भूमिका घेत आहेत, असा आरोप हलबीटोला येथील महिला आणि पुरुषांनी केला. आरोपींना अटक करा, आम्हाला पोलिस संरक्षण द्या, अशी मागणी मिरा मेश्राम, शकुंतला डोंगरे, ज्योती डोंगरे, वनमाला धोके, निर्मला कंबडे, शीला कंब‹डे, विमला कंब‹डे, शांता घरडे, शारदा डोंगरे, ज्योती डोंगरे यांनी केली.

त्या बोगस डॉक्टरची मुख्य भूमिका
गावात बाहेरहून एक बोगस डॉक्टर आला. त्याने दुकानदारी थाटली. सार्वजनिक हातपंपावर स्वतःचा विद्युत पंप लावला. दलित समाजाने त्यावर हरकत घेतली. त्यामुळे त्या डॉक्टरने हा सर्व खटाटोप केला, असा आरोप हलबीटोला येथील दलित समाजबांधवांनी केला.

हलबीटोला येथील तक्रार आमच्याकडे आली. त्या संबंधाने उपविभागीय अधिकारी आणि मी चौकशी करीत आहे. कोणावर अन्याय होऊ नये, या दृष्टीने चौकशी सुरु आहे.
प्रशांत सांगडे, तहसीलदार सालेकसा