खरीप पीक कर्ज शेतकरी मेळावे

0
14

गोंदिया : खरीप हंगाम २0१६-१७ करीता शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटपासाठी गोरेगाव तालुक्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
दि.१८ मे रोजी सेवा सहकारी संस्था दवडीपारतर्फे मोहगाव बुज. येथे, १९ मे कालीमाटी, २0 मे शहारवाणी, २१ मे मुंडीपार, २३ मे बोटे, २५ मे पाथरी, २६ मे गोरेगाव, २७ मे तेढा, २८ मे तिल्ली, १ जून रोजी कुर्‍हाडी येथे, २ जूनला सोनी, 3 ला कवलेवाडा, ४ रोजी घुर्मरा आणि ५ जूनला म्हसगाव येथील सेवा सहकारी संस्थेचे गट मुख्यालयात सकाळी १0 ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मेळावा होणार आहे.
या शेतकरी मेळाव्यात सेवा सहकारी संस्थांचे सचिव, संबंधित तलाठी, बँक निरिक्षक (कर्ज वाटप बँक प्रतिनिधी) तसेच सहकार विभागाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. पीक कर्ज मेळाव्यात शेतकर्‍यांनी गाव नमूना सात-बारा, दोन फोटो, केवायसी-आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्न, गाव नमूना ८ अ, सहखातेदार असल्यास संमतीपत्न (सातबारा, एकापेक्षा अधिक खातेदार असल्यास), संबंधित बँकेचे पासबुक इत्यादी कागदपत्न सोबत आणावेत. शेतकर्‍यांनी या मेळाव्यात उपस्थित राहून पीक कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदारांनी केले