कुर्‍हाडी प्राथमिक आरोग्य केंद्र वार्‍यावर

0
38

गोरेगाव-तालुक्यातील कुर्‍हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी १0 व ११ मे रोजी वरिष्ठ अधिकार्‍यांना न सांगता अनुपस्थित राहिल्यामुळे आलेल्या रुग्णांची हेळसांड झाली.
ओ.पी.डी. बंद ठेवण्यात आल्याने कुर्‍हाडी परिसरातील रुग्णांना खाजगी डॉक्टर कडे जाऊन उपचार द्यावा लागला. अनेक वेळा डॉक्टरउपस्थित राहत नसल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र वार्‍यावर असल्याची स्थिती निर्माण आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रात १६ गावातील रुग्ण येत असल्यामुळे बाह्य रुग्णांची संख्या मोठी असते. दररोज प्राथमिक आरोग्य केंद्रात ५0 ते ६0 रुग्ण येत असताना वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अनुपस्थिमुळे रुग्णांना आल्या पावली परत जावे लागते अन्यथा खाजगी डॉक्टरकडे उपचार घ्यावा लागतो.
या आरोग्य केंद्रात २ डॉक्टरची नियुक्ती असताना एकाच डॉक्टरकडे प्रभार देऊन काम चालविले जात आहे. सध्या कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर नासरे हे सुद्धा ११ महिन्याकरिता वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते आणित्यांचा कालावधी १५ दिवसांपूर्वीच संपलेला होता पण येणार्‍या अधिकार्‍याला प्रभार देण्याकरिता सेवा देत होते.
१0 ते ११ मे रोजी कुणालाही न सांगता अनुपस्थित राहिल्यामुळे दोन दिवस प्रा.आ.केंद्र वार्‍यावर राहिले. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या बाबीकडे गांभीर्र्यांने लक्ष देण्याची गरज आहे.
या आरोग्य केंद्रात १0 मे रोजी वंदना चेतन चकोले ही महिला प्रसूती करीता आली होती. आरोग्य परिचारिका लांजेवार यांनी आरोग्य केंद्रातच योग्यपणे केली, पण ११ मे रोजी बाळाला ताप आल्याने त्यांनी खाजगी डॉक्टरकडे नेऊन तपासणी केली त्यामुळे डॉक्टरच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांना बाहेर जाऊन उपचार द्यावा लागतो, ही बाब पुढे आली.