चंद्रपूर,नागपुरात पारा ४५.२ डिग्रीवर

0
9

गोंदिया-शनिवार पासून सुरु झालेल्या उन्हाचा कडाका काही केल्या कमी होताना दिसत नाही.शनिवार पासून वाढलेल्या उश्नेतेने आजही अशीच गती कायम ठेऊन आज नागपुरात पारा ४५.२ डिग्रीवर पोहचला. आज नोंद करण्यात आलेलं तापमान सामान्य तापमानापेक्षा २ डिग्रीने जास्त आहे.शनिवारी पारा ४५.६ डिग्रीवर पोहचला होता ज्यानंतर रविवारी या मोसमातील उचांक गाठत पारा ४५.७ डिग्री वर जाऊन पोहचला.आज मात्र यात  घसरण होऊन नागपूर शहरात ४५.२ डिग्री सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली.नागपूर पाठोपाठ विदर्भात सर्वाधिक उष्ण चंद्रपूर, वर्धा आणि अकोला राहिले.या सर्व जिल्ह्यात उष्णता ४५ डिग्रीवर कायम होती.पुढील काही दिवस उष्णतेची लाट अशीच कायम राहणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.

विदर्भातील शहराचं तापमान :

चंद्रपूर     –  ४५.२ डिग्री सेल्सिअस
नागपूर    –  ४५.२ डिग्री सेल्सिअस
वर्धा        –  ४५.० डिग्री सेल्सिअस
गोंदिया    –  ४४.६ डिग्री सेल्सिअस
अकोला    –  ४५.० डिग्री सेल्सिअस
यवतमाळ –  ४३.४ डिग्री सेल्सिअस
अमरावती –  ४३.० डिग्री सेल्सिअस
वाशीम     –  ४२.२  डिग्री सेल्सिअस