सामाजिक न्यायमंत्र्यांच्या गाडीला अपघात

0
14
गोंदिया : सामाजिक न्यायमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या वाहन क्रमांक एमएच ३५/डी-०८८८ या गाडीला गोंदिया – कोहमारा मुख्य मार्गावरील खजरी गावाजवळ आज (दि.२१) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास  अपघात झाला. सुदैवाने मोठी घटना घडली नाही.
गोंदिया येथील स्वागत लॉन येथे केबीन व्रूâ व एअर होस्टेस मुलाखत पूर्वतयारी प्रशिक्षण कार्यक्रम आटोपून ना.बडोले ताफ्यासह सडक अर्जुनीकडे निघाले. खजरी गावाजवळ पायलट गाडीच्या समोर बैलबंडी आली. बाजुला ट्रक होता. त्यामुळे पायलट गाडीच्या चालकाने ब्रेक मारला. पायलट गाडीच्या मागोमाग मंत्री महोदयांची गाडी सुरक्षीत अंतरावर थांबली. परंतु ताफ्यातील मागचे पोलीस वाहन ना.बडोलेंच्या गाडीला हळूवार धडकले. गाडीत बसलेल्यांना किरकोळ जखम झाली. ना.बडोलेंना देखील किरकोळ मार लागला. सडक अर्जुनीला पोहचल्यानंतर डॉक्टरला पाचारण करण्यात आले. सुदैवाने मोठी घटना होताहोता टळली.