कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

0
7

कोरची, ता.२६: नापिकीमुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेने ग्रासलेल्या एका अल्पभूधारक आदिवासी शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. मेहरुराम सुंदरसिंह पोरेटी रा.जामनारा असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मेहरुराम पोरेटी याच्या पत्नीच्या नावावर असलेल्या ९७ आर. जमिनीवर त्याने कोरची येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून १४ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु यंदा दुष्काळामुळे नापिकी झाल्याने कर्ज कसे फेडावे, तसेच यंदाचा खरीप हंगाम येऊन ठेपला असताना शेती कशी करावी, या विवंचनेने मेहरुरामला ग्रासले होते. यामुळे त्याचे पत्नी व मुलांसोबत भांडण झाले. अखेर त्याने २४ मे रोजी रात्री शेतातील झोपडीत गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.