गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव राममंदिर असलेल्या देसाईगंज तालुक्यातील आमगावात साजरा होणार रामनवमी उत्सव

0
4

रामाची उपासना करणाय्रा रामभक्तांसाठी नऊ दिवसांचे अखंड ज्योती कलश आयोजन केले जाते

गडचिरोली ( विष्णू वैरागडे)-देसाईगंज पासुन तीन किलो मिटर अंतरावर असलेल्या आमगांव पुरातन राममंदिरांत चैत्र शुद्ध नवमी हा चैत्रातील नवरात्राचा नववा दिवस असतो. चैत्र शुद्ध नवमी प्रतिपदेपासून मागील अनेक वर्षापासुन दरवर्षी आमगांव येेेथे नऊ दिवस हा उत्सव चालतो.श्रीराम मंदिर ट्रस्ट मार्फत श्री भागवत् सप्ताह आयोजन करुन यात रामायणाचे पारायण, कथाकीर्तन व राममूर्तीला विविध शृंगार, अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो.
चैत्र शुद्ध नवमी हा चैत्रातील नवरात्राचा नववा दिवशी रामाचा जन्म झाला.हा दिवस रामनवमी म्हणुन साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर दुपारी १२.०० वाजता रामजन्माचा सोहळा होतो.रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारासमवेतच गाठी पण घातल्या जात होते.राम जन्म झाल्यावर फटाके फोडल्या जात होते.नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते.
माध्यान्हकाळी कुंची बाळाच्या डोक्याला बांधायचे एक वस्त्र.हे वस्त्र पाठीपर्यंत असते.घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात व भक्‍तमंडळी त्यावर गुलाल व फुले उधळतात. श्रीरामाचा पाळणा दरम्यान रामजन्माचे गीत म्हटला जातो.’ त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात व प्रसाद म्हणून सुंठवडा देतात.त्यानंतर आरती करून सुंठवड्याबरोबर महाप्रसादही दिल्या जात होते.
देसाईगंज तालुक्यातील आमगांव येथील हिंदु धर्माचे आराध्य दैवताचे प्रतिक असलेल्या पुरातन राममंदिरात असुन रामनवमीला राममंदिर ट्रस्टच्या वतीने नऊ दिवसांचे श्रीमद् भागवत कथा आयोजित करण्यात आले असुन हवन, अन्नदान व महाप्रसादासह भरगच्च कार्यक्रमाची मेजवाणी राम भक्तांना दिली जाते.या सोबत या राममंदिरांत रामनवमी निमित्याने राम मंदिर ट्रस्ट च्या वतीने सामुहिक विवाह सोहळ्याचे देखिल आयोजन करण्यात येऊन सामाजिक दायित्व निभावल्या जाते. परंतु मागील कोरोणा काळापासून सामुहिक विवाह सोहळ्याला खंड पडला आहे.
रामाची उपासना करणाय्रा रामभक्तांसाठी नऊ दिवसांचे अखंड ज्योती कलश मंदिराजवळील भवनात आयोजन करण्यात येते. यावर्षी १८३ अखंड ज्योती तेवत आहेत.शिवाय जनजागृती पर विविध झॉंकी काढुन भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात येत होते, रामनवमीला आमगांव येेेथे यात्रेचे स्वरुप येत असते.

राम मंदिराचा रंजक इतिहास

या राममंदिराचा इतिहास मोठा रंजक आहे. आमगावात दिडशे वर्षांपूर्वी घनदाट आमराईने वेढलेल्या ठिकाणी एक चमत्कारी महाराज आले होते. ते इथे तप करित होते. या तपोभूमीत ते आपल्या अनुयायांना राख द्यायचे म्हणून त्यांना राखडे महाराज असे संबोधले जात होते. त्यांच्या राखेतून अनेकांना फायदा होत असल्याने महाराजांच्या या चमत्कारांमुळे हे ठिकाण प्रसिद्धी झोतात येऊ लागले. यातुनच पुत्र संतती नसलेले अर्जुनी मोरगाव येथील प्रसिद्ध उद्योगपती ब्रीजलाल पालीवाल हे राखडे महाराजांना भेटले. त्यांनी फायदा झाल्यास या ठिकाणी राममंदिर उभारण्याचे वचन घेतले. ब्रीजलाल पालीवाल यांना पुत्र संतती प्राप्त झाली. त्यांनी याठिकाणी जयपूर येथील प्रभु श्रीराम, लक्ष्मण,सिता व हनुमानाच्या साडेतीन फुटांच्या उंचीची मूर्ती आणून स्थापना केली. जवळपास दोन एकरात विस्तारलेल्या राम मंदिराच्या नाव अधिकार अभिलेखात दर्ज असुन स्वतंत्र सात बारा नमुना देखील आहे. आता ब्रीजलाल पालीवाल यांची चौथी पिढी गोपाल पालीवाल व उमेश पालीवाल हे आजही या राममंदिराच्या सेवेत आहेत. आमगावचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य वसंता ठाकरे यांनी सन १९९४ मध्ये खोब्रामेंढा, टिप्पागड, मार्कंडा सह आमगाव राममंदिर देखिल तिर्थक्षेत्र म्हणून समावेश करण्यासाठी ठराव मांडला. सन २००८ पासून आमगाव राममंदिराची शासनाने नोंद घेऊन “क”दर्जा पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले असुन पर्यटन निधी व आमदार निधीतून २ करोडची कामं आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नातून विकास कामे केली आहेत.