भंडारा-गोंदिया मतदारसंंघात उन्हातही मतदारांमध्ये उत्साह सायं.५ वाजेपर्यंत 56.87% मतदान

0
11

गोंदििया/भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी आज १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान सुरू असून अर्जुुनी मोरगाव विधानसभा मतदारसंंघात ३ वाजता मतदान प्रकिया पार पडली.भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात सायकांळ ५ वाजेपर्यंत 56.87% मतदानाची नोंद करण्यात आली असून मतदानाची वेळ ६ वाजेपर्यंत असल्याने ६५-७० टक्केपर्यंत मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यातच अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील बबई येथील मतदान केंद्रावर मतदानाची वेळ ३ वाजता संपल्याने व त्याचवेळी मतदानाकरीता गेलेले ६२ वर्षीय सुखराम रहागंडाले यांना मतदान करु दिले गेले नाही.त्यामुळे रहागंडाले यानी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.गोरेगावचे पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून त्यांची समजूत घालून खाली उतरवले.

मतदारसंघातील एकूण २१३३ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता मतदार सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर गर्दी करतील, अशी अपेक्षा होती. मात्र सकाळी ११ वाजता पर्यंत केवळ १९.७२ टक्के एवढीच मतदानाची टक्केवारी होती. मात्र दुपारनंतर प्रचंड उन असतानाही मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली. दुपारी १ पर्यंत ३४.५६ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.दुपारी ३.०० वाजेपर्यंत ४४.१२ टक्के मतदान झाले.त्यानंतर उन्हाची दाहकता कमी होताच मतदानात हळूहळू वाढ होऊ लागली आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात सायकांळ ५ वाजेपर्यंत मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी याप्रमाणे होती, ६०- तुमसर ५८.९४,६१- भंडारा-५६.७९,साकोली-५८.७९,63- अर्जुनी मोरगाव- 53.20,64- तिरोडा – 56.69,65- गोंदिया – 56.11 तर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील आमगाव मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ६४.६० टक्के मतदान झाले.

उन्हाची दाहकता लक्षात घेता मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यावेळी मतदानाचा टक्का वाढावा याकरिता प्रशासनाने महिनाभर जनजागृती उपक्रम राबविले होते. त्याचा प्रभाव मतदारांवर दिसत आहे. सकाळी मतदानाची टक्केवारी अपेक्षेपेक्षा फारच कमी होती. मात्र दुपारनंतर त्यात वाढ झाली.सर्वच मतदान केंद्रांवर मतदानासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. कुठे गर्भवती महिला तर कुठे लहान लहान मुलांना घेऊन महिलांनी भर उन्हात मतदानाचा हक्क बजावला.अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगानी सुध्दा उत्साहात मतदान केले.