आंबेडकरी चळवळीतील नेते नाना शेंडे यांचे निधन

0
14

नागपूर,दि.29-येथील माजी नगरसेवक व आंबेडकरी चळवळीतील नेते नाना शेंडे यांचे मुंबई नागपूर दुरांतो एक्स्प्रेस मध्ये निधन झाले. ते काल रात्री मुंबईहून नागपूरसाठी येण्यासाठी दुरांतो एक्स्प्रेस ने निघाले होते.आज सकाळी गाडी नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर आल्यावर इतर प्रवासी उतरले मात्र नाना शेंडे न उठल्याने इतर प्रवाश्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता ते मृतावस्थेत आढळून आले.ज्यानंतर रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह मेयो रुग्णालयात रवाना केला. पत्रकार, माजी नगरसेवक, आंबेडकरी चळवळीतील नेते,डॉ बाबासाहेब आंबेडकर बँकेचे संचालक अशा विविध स्तरावर नाना शेंडे यांनी कार्य केले.१९७४ साली दलित पँथरची चळवळ ऐन भरात असताना नामदेव ढसाळ यांचासोबत नाना शेंडे यांनी नागपुरात मोलाचे कार्य केले.मृत्युसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते.त्यांचामागे पत्नी,चार मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. झोपेतच हृदयविकाराचा धक्का आल्याने नाना शेंडे यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तरी पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.