अनैसर्गिक कृत्यप्रकरणी अजय धामेचाविरुध्द गु्न्हा दाखल

0
9

गोंदिया,दि.08-तिरोडा येथील एका अल्पवयीन मुलासोबत लैंगिक अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी वैद्यकिय व्यवसायात असलेल्या अजय रामू धामेचा विरुध्द तिरोडा पोलिसांनी आज शुक्रवारला(दि.8)सायकांळी लैंगिक अपराधापासून बालकांचे सरक्षण अधिनियम 2012,सहकलम 324,323 भादवि अन्वये गु्न्ह्याची नोंद करण्यात आले असून आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक स्वप्निल उनवणे यांनी दिली आहे.
फिर्यादी नामे उमाशंकर संतोष तिवारी, वय 28, राहणार तिरोडा याचे लेखी तक्रार आणि वैद्यकीय परीक्षण अहवालावरून गु्न्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.07/07/16 रोजी संध्याकाळी 19 ते 20 वाजेच्या सुमारास आरोपी अजय रामु धामेचा, अंदाजे वय 33, राहणार सिंधी कॉलोनी, तिरोडा याने फिर्यादीचा अल्पवयीन मुलगा अंश (वय 2) यास चॉकलेट देऊन चारचाकी गाडी मधून फिरवून आणतो, असे सांगुन पीडित मुलास घेऊन लैंगिक उद्देशाने बाहेर घेऊन गेला.त्यानंतर त्याचा गुप्त भाग हाताळून तसेच त्याच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण करून दुखापत केल्याने पिडीत मुलाच्या वैद्यकीय परीक्षण अहवाल आणि फिर्यादीच्या लेखी रिपोर्टवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.वृत्तलिहिपर्यंत आरोपीला अटक मात्र होऊ शकली नव्हती.
विशेष म्हणजे सदरच्या प्रकरणात पोलीस तक्रार होऊ नये यासाठी बरचे प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा तिरोडाच नव्हे तर गोंदिया शहरात सुध्दा होती.पिडीत मुलाला जेव्हा उपचारासाठी येथील बाई गंगाबाई रुग्णालयात आणण्यात आले.तेव्हा फक्त डाॅ.केंद्रे व डाॅ.सुर्वणा हुबेकर यांनी रुग्णाची परिस्थिती बघुन प्राथमिक उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला.मात्र मुलाची प्रकृती बघता वरिष्ठ रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी जोपर्यत सहकार्य करणार नाही तोपर्यंत काहीच होणार नव्हते.तेव्हा प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.अमरिश मोहबे यांना सामाजिक कार्यकर्ते कुशल अग्रवाल,डाॅ.नितेश बाजपेयी,उमेश दमाहे आदींनी योग्य उपचाराची मागणी केली.तेव्हा मोहबे यांनी उपचारासाठी सहकार्य न करता असहकार्याची भूमिका घेतल्याने कुशल अग्रवाल या सामाजिक कार्यकर्ताने स्वत पुढाकार घेत पिडीत मुलाला स्वखर्चाने गोंदिया हाॅस्पीटल येथे उपचारासाठी दाखल केले.सध्या पिडीत मुलगा अंश हा गोंदिया हाॅस्पीटलमध्ये आयसीयुमध्ये भरती असून त्याचावर तिथे उपचार सुरु करण्यात आले आहेत.गोंदियातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय मतभेद बाजूला सारत या पिडीत मुलाला योग्य उपचार मिळावे यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
दरम्यान डाॅ.मोहबे यांनी केलेल्या प्रकरणाची माहिती लगेच या प्रकरणाची तक्रार पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांच्यासोबत पालकमंत्री,खासदार व आरोग्यमंत्र्यांना सुध्दा कळविण्यात आली आहे.