डेंगू मलेरिया रोखण्यासाठी फाँगीग मशिनचा वापर

0
6

गोरेगाव,दि.२४-नव्यानेच अस्तित्वात आलेल्या गोरेगाव नगर पंचायतीच्यावतीने गावातील आरोग्य व्यवस्था सुरळीत राहावी तसेच पावसाळाच्या दिवसात डेंगू ,मलेरियासारखे रोग पसरू नये यासाठी फागींग मशिनच्या माध्यमातून फवारणी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.पावसाळाच्या दिवसात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाणी साचलेल्या भागात तसेच सांडपाणी वाहून नेणाèया नालीमध्ये फागींगच्या माध्यमातून फवारणी करण्याची योजना स्वच्छता व आरोग्य विभागाचे सभापती तसेच उपाध्यक्ष इंजि.आशिष बारेवार यांनी मांडली.त्यास स्वीकृत करून नगराध्यक्ष सीमा कटरे यांच्या परवानगीने पहिल्या टप्यात नाल्याची सफाई करणे,रस्त्याकिनाèयावरील खड्डे भरणे आणि ब्लिqचग पावडरचा वापर करण्यात आला.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नाकाडे यांच्या मार्गदर्शनात गोरेगावच्या प्रत्येक भागात फॉगीगंच्या मशिनच्या माध्यमातून फवारणीचे काम करण्यात आले आहे.गेल्या वर्षी डेंगूचे रुग्ण आढळल्याने यावेळी मात्र खबरदारी घेतली जात आहे.