प्रत्येक कुटुंबाला योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न-पालकमंत्री बडोले

0
12

पूर्व तयारी समाधान शिबीर
गोंदिया,दि.२४ : शासन आपल्या दारी या संकल्पनेतून महाराजस्व अभियानाअंतर्गत ऑगस्ट महिन्यात महासमाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध ५० पेक्षा जास्त योजनांचा लाभ ४० हजार लाभाथ्र्यांना देण्याचे निश्चित केले आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
आज २४ जुलै रोजी सडक/अर्जुनी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नविन इमारतीत महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजित पूर्व तयारी समाधान शिबिराचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, पं.स.सदस्य राजेश कठाणे, गिरीधारी हत्तीमारे, तहसिलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी बी.आर.लोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शासनाच्या योजना जास्तीत जास्त लाभाथ्र्यांना देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, यासाठी सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगाव व गोरेगाव तहसिल कार्यालय येथे स्वतंत्र समाधान नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.
डॉ.सूर्यवंशी म्हणाले, पूर्व तयारी समाधान शिबिरात उपस्थित लाभाथ्र्यांची संख्या बघून खऱ्या अर्थाने समाधान होत आहे. येथे असलेल्या विविध स्टॉलवरुन योजनांचे अर्ज लाभाथ्र्यांनी परिपूर्ण भरुन समाधान नियंत्रण कक्षात सादर करावे. हक्काने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे जावून लाभाथ्र्यांनी योजनांचा लाभ मिळण्याची मागणी करावी.
डॉ.पुलकुंडवार म्हणाले, आजच्या पूर्व तयारी समाधान शिबिराला मिळालेला लाभाथ्र्यांचा प्रतिसाद उदंड आहे. पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून विविध योजनांचा लाभ लाभाथ्र्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात येत आहे.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सडक/अर्जुनी तालुक्यातील प्रविण मत्स्यपालन सहकारी संस्था मालीगुंजा या संस्थेचे सदस्य जनीराम मेश्राम यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसदार पत्नी धर्मशिला मेश्राम यांना केंद्र पुरस्कृत अपघात गटविमा योजनेचा १ लक्ष रुपयाचा धनादेश देण्यात आला. कार्यक्रमाला सडक/अर्जुनी तालुक्यातील विविध गावातील जवळपास १३ हजार लाभार्थी उपस्थित होते. यावेळी लाभाथ्र्यांनी विविध विभागाच्या स्टॉलला भेट देवून त्यांच्याशी संबंधित असलेल्या योजनांची माहिती जाणून घेतली.कार्यक्रमाला जिल्हास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी केले. संचालन श्री.मेश्राम यांनी, तर उपस्थितांचे आभार गटविकास अधिकारी बी.आर.लोकरे यांनी मानले.