ब्रम्हपूरी तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ

0
11

रवि पिसे
ब्रम्हपूरी,दि.9 तालुक्यातील मेंडकी जवळच्या चिचखेडा आणि गणेशपूर या गावात गत पाच दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पाळीव जनावरे आणि मोकाट कुत्र्यांवर बिबट्या हल्ला करीत आहे. त्यामुळे शेतात काम करणा-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चिचखेडा येथील काही महिला कपडे धुण्याकरिता गावा शेजारील तलावाजवळ गेल्या तेव्हा एका झुडपात बिबट्या दडी मारून बसला असल्याचे महिलांना दिसले. तेंव्हा महिलांनी गावाकडे पळ काढला. त्यानंतर गावातील काही नागरिक काठ्या घेऊन बिबट्याला हाकलण्यासाठी गेले. मात्र, बिबट्या जंगलात न जाता गावाकडे पळाला आणि पोलिस पाटील विलास जांभुळे यांच्या शेतातील सावरीच्या झाडावर चढला. हे कळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले. बिबट्या एक ते दोन वर्षांचा असावा, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे