कर्जमुक्ती देण्यास शासनाची टाळाटाळ :३५४ शेतकर्यांना सावकारांचा जाच

0
6

पन्नासावर शेतकèयांचा हल्लाबोल
गोंदिया,ता. ९ : देवरी तालुक्यातील पाच हजारांवर शेतकèयांनी सावकाराकडून कर्ज घेतले.३५४ शेतकèयांना तालुकास्तरीय समितीने पात्र ठरविले. जिल्हास्तरीय समितीकडे विषय रेंगाळला. सावकारांनी शेतकèयांकडे कर्ज वसुलीचा तगादा लावला. त्यामुळे शेतकरी पेचात पडले. अनेकदा पत्रव्यवहार करून देखील जिल्हा उपनिबंधक कार्यालय त्याकडे डोळेझाक करत आहे. हा प्रकरण तत्काळ मार्गी लावून शेतकèयांना कर्जमाफीचा लाभ द्यावा. दोषी सावकार आणि अधिकाèयांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीकरिता आज(ता.९) पन्नासावर शेतकèयांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाबर हल्लाबोल केला.
शासनाने दुष्काळ जाहीर केला. त्यात गोंदिया जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आला. ज्या शेतकèयांनी सावकारांकडे सोने किंवा जमिनी तारण ठेवून कर्ज घेतले, त्या शेतकèयांचे कर्ज शासन भरून देणार होते. त्याकरिता सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकèयांची यादी मागविण्यात आली. परंतु, देवरी तालुक्यातील चार सावकारांपैकी तीन सावकारांनी शासनाची फसवणूक करत बोटावर मोजण्याइतक्या शेतकèयांची यादी शासनाला पाठविली. त्यांची चौकशी करण्यात आली. त्यातील ५० प्रस्ताव कर्ज माफिकरीता अपात्र, तर ३५४ प्रस्ताव तालुकास्तरीय समितीने पात्र ठरविले. ३१ मार्च पुर्वीच हे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात आले. परंतु, जिल्हा समितीने अद्याप त्या प्रस्तावांना मंजुरी दिली नाही. त्यामुळे पात्र ३५४ प्रस्ताव आणि जी प्रकरणे सावकांरानी शासनाकडे सादर केले नाही, त्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. शेतकèयांनी सावकार कर्जमुक्ती मिळेल, या अपेक्षेने कर्जाची रक्कम भरली नाही. त्यामुळे वर्षभराचा व्याज त्यांच्यावर बसला.गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी दुय्यम निबंधक कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि लोकप्रतिनिधींकडे चकरा मारत आहेत. परंतु, दुय्यम निबंधक कार्यालय आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालय खोटी आश्वासने देवून शेतकèयांची बोळवण करत आहेत. आता हा प्रकार खूप झाला, आम्हाला न्याय द्या अन्यथा आंदोलनाला तयार राहा, असा सज्जड इशारा शेतकèयांनी आज, मंगळवारी जिल्हा उपनिबंधकांना दिला. येत्या १९ तारखेपर्यंत आम्हाला न्याय द्या, अन्यथा २२ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा शेतकèयांनी दिला.