गोंदिया-जबलपूर ब्रॉडगेजवर धावणार पॅसेंजर

0
8

गोंदिया : मध्यप्रदेशातील जबलपूर ब्रॉडगेज मार्गावर पॅसेंजर गाडी सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. गोंदिया-जबलपूर ब्रॉडगेज अंतर्गत जबलपूर ते सुकरीमंगेला दरम्यान येत्या स्वातंत्रदिनापासून म्हणजे १५ आॅगस्टपासून गोंदिया-जबलपूर पॅसेंजर ट्रेन सुरू करण्यासाठी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे प्रशासनाने चाचण्या सुरू केल्या आहे.मंडळ रेल्वे व्यवस्थापक अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, जबलपूर ते सुकरीमंगेलादरम्यान १५ आॅगस्ट रोजी पॅसेंजर ट्रेन चालविण्याचा विचार सुरू आहे. परंतु सर्व कामसुद्धा पूर्ण करावयाचे आहे. मुख्य सुरक्षा आयुक्तांद्वारे ट्रायल घेतल्यानंतर त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच सदर ट्रेन सुरू करणे शक्य होणार आहे

सदर ब्रॉडगेजच्या ट्रॅकवरून पहिल्यांना इंजिनचे ट्रायल घेण्यासाठी नागपूर मंडळाचे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल आपल्या चमूसह पोहोचले होते. कछपुरावरून रवाना झाल्यावर १० मिनिटांनंतर इंजिन गढा स्थानकावर पोहोचले. तेथे निरीक्षणादरम्यान प्लॅटफार्मसह शेडचे अपूर्ण बांधकाम व चिखलयुक्त स्थिती पाहून ते स्थानिक व्यवस्थापनावर नाराज झाले. त्यांनी सर्व अपूर्ण कामांचे छायाचित्र घेतले. त्यानंतर त्यांनी ग्वारीघाट, जमतरा, चारघाट पिपरिया व बरगी येथेसुद्धा इंजिन थांबवून निरीक्षण केले.