पत्रकारांनी निर्भिडपणे टिकात्मक लेखण करावे-ना.बडोले

0
26

श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण थाटातshramik 4
गोंदिया,दि.16- पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. समाजाचे प प्रतिबिंब त्याच्या लेखणीच्या माध्यमातून व्यक्त होत असते. मात्र या लेखणीचा वापर करतांना या क्षेत्रातील मर्य़ादेचे भान पत्रकारांना राहिले तर समाजासाठी ते उपयोगी ठरेल. पत्रकारांनी निर्भीडरित्ङ्मा टिका करावी मात्र ती विधायक स्वरूपाची असावी असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राजकुमार बडोले यांनी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने राईस मिलर्स असोशिएशनच्या सभागृहात आयोजित टिळक गौरव पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलतांना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी अल्ताफ शेख होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती उषा मेंढे, भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष विनोद अग्रवाल, शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,राईस मिलर्स असो.चे उपाध्यक्ष गुड्डू कारडा,मार्गदर्शक प्रा.एच.एच.पारधी,सचिव संजय राऊत,टिळक जिवन गौरव पुरस्काराचे मानकरी भगत ठकरानी उपस्थित होते. shramik 6
ना.बडोले पुढे म्हणाले की,लोकमान्य टिळक,डॉ.बाबासाहेब आबेंडकर,जांभेकर यांनीही आपल्या लेखणीतून समाज घडविण्याचे कार्य केले आहे.त्यांच्या काळातील पत्रकारीता आणि आजच्या पत्रकारीतेतच नव्हे तर परिस्थितीतही बदल झालेला आहे.अशा परिस्थितीतही गोंदिया जिल्ह्यातील पत्रकारांनी एक चांगला ठसा आपल्या लेखणीतून सामाजिक कार्यासोबतच,विविधांगी विकासात्मक कार्यातही उमटविला आहे.श्रमिक पत्रकार संघ गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने हा पुरस्कार सोहळा आयोजित करीत असून मी प्रत्येक कार्यक्रमाचा एक साक्षीदार आहे.भविष्यातही श्रमिक पत्रकार संघाने याचप्रकारे यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन करावे आपण नेहमी पाठीशीच नव्हे तर सोबत राहणार असल्याची ग्वाही दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी या प्रसंगी बोलतांना श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने राबविल्या जाणार्या उपक्रमाचे कौतुक करून पत्रकारांनी विधायमक स्वरूपाची टिका करावी अशी सूचना केली. तसेच पत्रकार हा चौथा स्तंभ असून यांची बारीक नजर प्रत्येकाकडे असते पत्रकार भवनाचा मुद्दा पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सोडवावा असे आवाहन केले.भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी पत्रकार संघाच्या विधायक कामाची प्रशंसा करून प्रत्येक विधायक कामात सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.राजकीय,सामाजिक क्षेत्रात पत्रकाराची मोलाची भूमिका असून स्वच्छ राजकारणासाठी पत्रकारांची लेखणी महत्वाची असल्याचे म्हणाले. सभापती पी.जी.कटरे यानी याप्रसंगी पत्रकारांना आवाहन केले की प्रशासकीय चुका त्यांनी लक्षात आणून दयावा, जेवढी टिका करता येईल ती करावी या टीकेतूनच चांगले फळ येतील.
याप्रसंगी अतिथीच्या हस्ते यावर्षीचा टिळक गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेले गोंदिया बाजारचे संपादक भगत ठकरानी याचा शाल, श्रीफळ,स्मृतीचिन्ह,पर्यटनपुस्तिका आणि शब्दकोष, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. स्व. मनोहरभाई पटेल संपादकीय पुरस्कार टीआरपी न्युजचे कार्यकारी संपादक मोहन पवार, स्वातंत्र्य सैनिक स्व. हिरालाल जैन विकास वार्ता प्रथम पुरस्कार प्रिंटमेलचे अर्जुनी मोरगाव प्रतिनिधी राधेश्याम भेंडारकर व द्वितीय पुरस्कार लोकमत समाचारचे आमगाव प्रतिनिधी रितेश अग्रवाल यांना,श्रमिक पत्रकार संघ वृत्त वाहिनी प्रथम पुरस्कार आयबीएन व युसीएनचे प्रतनिधी हरिष मोटघरे व द्वितीय पुरस्कार न्युज नेशनचे रवी सपाटे यांना, स्व. संतोष अग्रवाल स्मृती शोध पत्रकारिता प्रथम पुरस्कार सकाळचे सालेकसा तालुका प्रतिनिधी राजू दोनोडे व द्वितीय पुरस्कार तरुण भारतचे प्रमोद नागनाथे यांना तसेच उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार स्वंतत्र छायाचित्रकार प्रा.शरद मेश्राम यांना मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवान्वित आले.पुरस्कारामध्ये स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र,शब्दकोष,पर्यटन पुस्तिका व रोख पुरस्कार देण्यात आले.त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थामध्ये किशोर काळबांडे,सावी गाडेगोणे,चंचल अग्रवाल,आसमा खान व अनुश्रेय भोयर यांना स्मृतिचिन्ह,शब्दकोष,पर्यटनपुस्तिका व रोख पुरस्कार देऊन गौरवान्वित आले.प्रास्तविकात कार्यक्रमाचे सयोंजक चंद्रकुमार बहेकार यांनी श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमाबद्दल तसेच पुरस्काराबद्दल माहिती दिली. पत्रकार संघाचे मार्गदर्शक प्रा.एच.एच.पारधी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.संघाचे सदस्य खेमेंद्र कटरे यांनी पत्रकार संघाच्या पुरस्कार कार्यक्रमाबद्दल माहिती देतांना सांगितले की,येत्या वर्षापासून पत्रकार संघाचा हा कार्यक्रम ६ जानेवारी पत्रकार दिनी आयोजित करण्यात येणार असून पत्रकार,गुणवंत विद्यार्थी यांच्यासोबत जिल्ह्यातील गुणवंत अधिकारी/कर्मचारी,सामाजिक कार्यात उल्लेखनिय कार्य करणारे व्यक्ति आणि कृषीच्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करुन जिल्ह्यात नवी दिशा देणाèया एका प्रगतीशिल शेतकèयाचा सत्कार ६ जानेवारी २०१८ च्या होणाèया कार्यक्रमात करण्यात येणार असल्याची माहिती दिली.संचालन संघाचे सदस्य सावन डोये यांनी केले.आभार संजय राऊत यांनी मानले.काङ्र्मक्र‘ाला वरिष्ठ पत्रकार चंद्रकांत पांडे,चंद्रकांत खंडेलवाल,विश्वास बोम्बार्डे,हौसलाल रहागंडाले,नागनाथे,जितेश राणे,भरत शरणागत,श्रीमती उमा पवार,अ‍ॅड.अर्चना नंदागले,सविता तुरकर,पत्रकार जयंत शुक्ला,समिर बनसोडे,सुरेश भदाडे,प्रकाश रहागंडाले,माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे,दिपक कदम, सरला भारद्वाज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे राईस मिलर्स असो.चे उपाध्यक्ष गुड्डू कारडा यांच्याकडून सर्व विजेते पत्रकार व गुणवंत विद्यार्थांना शब्दकोष सप्रेम भेट देण्यात आले.सोबतच बेरार टाईम्सच्यावतीने प्रकाशित विदर्भ पर्यटन पुस्तिका सुध्दा देण्यात आली.
सर्व पाहुण्याचे स्मृतीचिन्हा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यशस्वतीतेसाठी चंद्रकुमार बहेकार, सावन डोये,उदय चक्रधर, खेमेद्र कटरे, मेहेंद्र बिसेन, ओमप्रकाश सपाटे, बाबाभाई शेख, सुरेश येळे, भरत घासले, हरिश मोटघरे,विकास बोरकर,महेंद्र माने,आनंद मेश्राम‘,देवेंद्र बिसेन,प्रमोद भोयर,ऋषी कावळे,नविन अग्रवाल,दिलीप लिल्हारे,मनिष मुनेश्वर,विजय लाटा आदींनी सहकार्य केले.