संपत खिल्लारी : ‘संवादपर्व’ माहिती जनसंपर्क महासंचालकाचा उपक्रम

0
9

भंडारा : शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या योजना व उपक्रामची जनजागृती व्हावी, तसेच त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा. या योजनेत नागरिकांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा व क्रियाशिलता वाढवावी हाच संवादपर्व कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे प्रतिपादन भंडाराचे उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी यांनी केले.
गणेशोत्सवात सामाजिक जाणीव जागृतीची, प्रबोधनाची श्रेष्ठ परंपरा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने पुढे नेण्यासाठी ठरविले आहे. गणेशोत्सवादरम्यान संवादपर्व जनप्रबोधनात्मक उपक्रम राज्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने गणशेपूर येथील सन्मित्र गणेशोत्सव मंडळात आयोजित संवादपर्व कार्यक्रमात ते बोलत होते.
संवादपर्व कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवी धकाते, अग्रणी बँकेचे विजय बागडे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, आरोग्य माहिती व विस्तार अधिकारी भगवान मस्के, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, सन्मित्र गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विनोद भुरे, सचिव संजय भांडारकर उपस्थित होते.
यावेळी डॉ.खिलारी म्हणाले, आपण स्वत:चा व कुटुंबाचा विचार करतो. परंतु त्याबरोबर सर्व समाजाचा विचार करणे आवश्यक असून आपल्या बुद्धीचा योग्य वापर करून समाजाची उन्नती कशी होईल यावर भर दिला पाहिजे. शासनासोबत राहून त्यांच्या योजना समाजासमोर पोहचवून समाजाचा उत्थान व हातभार लावू शकतो. असे आवाहन केले.