नऊ किलोमीटरसाठी किती प्रतीक्षा?

0
8

भंडारा,दि.04 : भंडारा शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे रूंदीकरण अजुनही झालेले नाही. महामार्गाचे विस्तारीकरण केव्हा होईल या बाबीला घेऊन जिल्हा पोलिस प्रशासन तथा जिल्हा प्रशासनातील विविध विभाग अनभिज्ञ आहे. राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण हा विषय जिल्हा प्रशासनाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील असलयने अधिकारी विचार करण्यापलिकडे कुठलेही ठोस पाऊले उचलू शकत नाही.
भंडारा शहरातून गेलेला हा जवळपास ९ किलोमीटरचा रस्त्याचे रूपांतर ‘फोरलेन’मध्ये न झाल्याने वाहतुकीची समस्या दिवसेंगणिक गंभीर रूप धारण करित आहे. मुजबी ते शिंगोरी मार्गाचे विस्तारीकरण न होणे ही मुळ समस्या आहे. या समस्यावर अजुनही निर्णय घेण्यात आलेला नाही.
या विषयाला घेऊन जिल्हा पोलिस प्रशासनाची चिंता वाढली आहे. ‘फोरलेन’च्या कामासाठी वनविभागाची मंजुरी आडकाठी यासह अन्य तांत्रिक कारणे कारणीभूत आहेत. यामुळेच भंडारा ते देवरी मार्गावरील काही भागाचे विस्तारीकरणाची कामे अपूर्ण आहेत. मुजबी ते शिंगोरीपर्यंतचा ९ किलोमीटरचा रस्ता तांत्रिक कारणांचा बळी ठरला आहे.
जिल्हा प्रशासन तथा महामार्ग प्राधिकरण यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशिल असले तरी यावर अजुनपर्यंत समाधानकारक तोडगा निघालेला नाही.
राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण करताना ते शहरातून होणार की ‘बायपास’चा मार्ग निवडणार? या प्रश्नाचे उत्तरही गुलदस्त्यात आहे. यावर भविष्यात लवकर तोडगा निघणे आवश्यक आहे.