लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपींना पोलिस कोठडी

0
14
बुलडाणा, दि. 04 – खामगाव तालुक्यातील पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रम शाळेत अल्पवयीन मुलीचे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ११ आरोपींना शुक्रवारी खामगाव न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

घटनेतील भरत विश्वासराव लाहुडकार (मुख्याध्यापक प्राथमिक) व विजय रामुजी कोकरे हे दोन आरोपी फरार आहेत.  पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रूपाली दरेकर करीत आहेत.
तालुक्यातील पाळा येथे श्री रामचंद्र महाराज सेवाभावी संस्था गणेशपूर द्वारा संचालित स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रम शाळेत १० वर्षीय मुलीवर सामुहिक अत्याचार करून लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पिडीत अल्पवयीन मुलीच्या पालकांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरूवारी रात्री १३ जणाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील ११ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर २ आरोपी अद्यापही फरार आहेत. दरम्यान अटक केलेल्या इत्तुसिंग काळुसिंग पवार (वय २३) रा. उमरा, डिगांबर राजाराम खरात (वय ३९) रा. इसोली, स्वप्नील बाबुराव लाखे (वय २२) रा. मोरगाव सादीजन, नारायण दत्तात्रय अंभोरे (वय २७) रा. निपाना, दिपक अण्णा कोकरे (वय ३०) रा. गणेशपूर, ललिता जगन्नाथ वजीरे (वय ३७) रा. नाथप्लॉट खामगाव, मंठाबाई अण्णा कोकरे (वय ४७) रा.गणेशपूर, शेवंताबाई अर्जुन राऊत (वय ६०) रा. घारोड, संजय अण्णा कोकरे (वय ४६) रा. गणेशपूर, गजानन निंबाजी कोकरे (वय ६०) रा. गणेशपूर, पुरूषोत्तम गंगाराम कोकरे (वय ४७) रा.गणेशपूर या ११ आरोपींना शुक्रवारी खामगाव न्यायालयापुढे हजर केले असता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.टी. सुर्यवंशी यांनी सर्व आरोपींना १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड.राजेश्वरी आळशी यांनी काम पाहिले.