ओबीसी अधिकारी कर्मचार्यानी रजा घेऊन महामोर्च्यात सहभागी व्हावे-पाथोडे

0
12

गोंदिया,दि.20- राष्ट्रीय ओबीसी महासंघ,गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी सेवासंघाच्यावतीने येत्या ८ डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर  आयोजित ओबीसी महामोर्च्यात ओबीसी समाजातील अधिकारी,कर्मचारी वर्गाने त्या दिवसाची किरकोळ रजा घेऊन आपले प्रतिनिधीत्व दाखविण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राज्य प्रतिनिधी व ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाचे मार्गदर्शक लिलाधर पाथोडे यानी केले.ते गोंदियाच्या नुतन शाळेत ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने शुक्रवारला आयोजित ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाच्या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय पक्ष समन्वयक माजी खासदार डाॅ.खुशालचंद्र बोपचे होते.यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,कार्याध्यक्ष अमर वराडे,संघटक जिवन लंजे,ओबीसी संघर्ष कृती समितीचे मार्गदर्शक व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रसिध्दी प्रमुख खेमेंद्र कटरे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव शिशिर कटरे,उपाध्यक्ष कैलास भेलावे,एस.यु.वंजारी,ओबीसी कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष तुलशीदास झंझाड,विनोद चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. समुदायाचा भव्यमोर्चा, काढण्यात येणार आहे.या अनुसंघाने तयारीसाङ्गी ङ्गिकङ्गिकाणी सभांचे आयोजन होत असून काल शुक्रवारला गोंदिया आणि देवरी येथे ओबीसी संघर्ष कृती समितीने बैङ्गका घेऊन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.यावेळी डाॅ.बोपचे यांनी ओबीसी अधिकारी कर्मचारी भरतीमध्ये कशाप्रकारे पिळवणूक केली जाते याची सविस्तर माहिती देत हे आंदोलन ओबीसीच्या जनजागृतीचेच नव्हे तर विकासासाठी नवे पर्व ठरणार असून आपल्याला आपले शक्तीप्रदर्शन दाखविण्याची हीच संधी असल्याचे ते म्हणाले.यावेळी बबलू कटरे यांनी गोंदिया जिल्ह्यात ओबीसी चळवळीच्या माध्यमातून राबविण्यात येणारे कार्यक्रम व जनचेतना अभियानाची माहिती दिली.तसेच या अभियानासाठी येणारा खर्च भागविण्यासाठी सर्वांना तन मन धनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले. संवैधानिक अधिकारासाठी मागील अनेक वर्षापासून ओबीसींचा लढा सुरु आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलन ३४० नुसार ओबीसींना त्यांच्या आर्थिक, सामाजीक, व शैक्षणिक विकासासाठी घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. मात्र या कलमाची पुर्णतः अंमलबजावणी झालेली नाही. शासनाच्या अन्यायात्मक धोरणाचा निषेध  नोंदविण्यासाठी नागपूर येथील विधान भवनावर ८ डिसेंबर ला मोर्चा काढण्यात येत असल्याचे सांगितले.  यावेळी अरुन बिसेन, एस.यु वंजारी, एस.एम. पारधी, एन.के रहांगडाले, रेशीम कापगते, महेंद्र हरीणखेडे, वसंत निखाडे, रमेश ब्राम्हणकर, बंशीधर शाहारे,गुणवंत ठाकूर,तिर्थराज उके,पळस्कर,शंकर पारधी,पी.पी.काळे,अनिरुध्द शहारे  आदींसह 50 च्यावर ओबीसी अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.