राष्ट्रवादीने विकासालाच दिले प्राधान्य-प्रफुल्ल पटेल यांचे प्रतिपादन

0
11

भंडारा ,दि.13-: भंडारा शहाराने राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांच्या प्रामाणिक कार्यावर आतापर्यंत भरोसा केला त्यामुळेच शहरात प्रामाणिकपणे विकासाची कामे झालीत. ज्याप्रमाणे आपण माझ्यावर प्रेम करता व विश्वास ठेवता त्या विश्वासाला तडा जाणार नाही तेव्हा भंडारा शहराच्या विकासासाठी नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला संधी द्यावी असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री खा. प्रफुल्ल पटेल यांनी नगरपरिषद निवडणूक प्रचारार्थ उमेदवारांच्या प्रचार सभेत केले.
भंडारा शहरातील मुस्लीम लायब्ररी चौकात आयोजित प्रचार सभेत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते खा. प्रफुल पटेल उपस्थित होते. मंचावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भगवान बावनकर, राकॉ जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी मंत्री नाना पंचबुध्दे, धनंजय दलाल, सुनिल फुंडे, नरेश डहारे, बाबूराव बागडे, अ‍ॅड. जयंत वैरागडे, महेंद्र गडकरी, डॉ. जगदीश निंबार्ते, विनयमोहन पशिने, परवेज पटेल, शहजादभाई सोहेल अहमद, बल्लीभाई, राजू पटेल, मकसुद पटेल, डॉ. रविंद्र वानखेडे, फैजल पटेल उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, विद्यमान सरकारचे वरिष्ठ नेते सामान्य जनतेला केंद्र आणि राज्यात आमची सरकार आहे. जर आम्हाला निवडून दिले नाही तर पाहुन घेऊ अशी भाषणे देताना मतदारावर धमकी वजा दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. जणू काही तेच सर्वेसर्वा आहेत तेव्हा अशा धमक्यांना मतदार घाबरणार नाहीत विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सदैव जनतेच्या पाठीशी उभी आहे.
केंद्र सरकारच्या नोटबंदी निर्णयावर ताशेरे ओढतांना नोटबंदीमुळे भ्रष्टाचार, आतंकवाद, नक्षलवाद, काळापैसा यावर अंकुश लावण्यासाठी व देशहितासाठी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे समर्थन करते. परंतु जनसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, मजूर व गरीब जनतेला आपलेच पैसे काढण्यासाठी दिवसरात्र रांगेत उभे राहावे लागते. तेव्हा केंद्रातील नियोजन अपयशी असल्याचे सांगितले.
यावेळी कविता भोंगाडे, सुनिल साखरकर, माधुरी चौधरी, मंगेश काटेखाये, जुमाला बोरकर, विनयमोहन पशिने, आनंद रामटेके, स्वाती बादशहा, किरण कुंभरे, लता बागडे, शशिकला बानेवार, राहुल वाघमारे, नरेश भिवगडे, प्रियंका पडोळे, उमेश ठाकरे, भिमा रेवतकर, अमीर मो. खान मेहबेगम, अरुण अंबादे, शुभांगी खोब्रागडे, अमर उजवणे, अश्विनी बुरडे, सिंधूताई सेलोकर, बल्ली मकसुद पटेल, हाजी अखतरी बेगम, सिमा निखार, मौसमसिंग ठाकुर, स्मिता सुखदेवे, क्रिष्णा उपरीकर, तृप्ती मोगरे, हर्षा बावणकर उपस्थित होते.प्रास्ताविक भगवान बावनकर यांनी तर संचालन विजय खेडीकर यांनी आभारप्रदर्शन नितीन तुमारे यांनी केले.