नोटाबंदीमुळे गरीब-श्रीमंत यातील भेदभाव मिटला-मुख्यमंत्री फडणवीस

0
11

साकोली,दि.13- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषद व नगर पंचायतीत करुन पिण्याचे शुध्द पाणी, राहायला घर व रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले. यासारखे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेवून जनतेला मुख्य प्रवाहात आणले. नोटबंदीचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन काळा पैसा काढून गरीब व श्रीमंत यातील भेद मिटविण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

साकोली येथील होमगार्ड परेड ग्राऊंड येथे पालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी आले असता ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, खासदार नाना पटोले, आ. बाळा काशीवार, आ. अनिल सोले, धनवंता राऊत उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, भाजपाची ही सरकार शेतकऱ्यांची सरकार असून त्यांच्या अडीअडचणी दूर करणारी आहे. सरकारने आतापर्यंत पाच कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले असून अजून ८ कोटी महिलांना गॅस कनेक्शन देणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान, यासारखी अनेक लोकहिताच्या योजना अमलात आणून यशस्वीरित्या पार पडल्या. तर गावागावात स्वच्छता अभियान, आरोग्य यासारख्या योजना ही अमलात आणल्या.

यावेळी खासदार नाना पटोले म्हणाले, काळानुसार नागरी सुविधा निर्माण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे साकोली नगरपरिषदेच्या सर्वांगीण विकासाकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही व साकोलीची नगर परिषद ही सर्वोत्कृष्ठ नगर परिषद तयार करणार आहे. असे सांगितले. आ. बाळा काशिवार म्हणाले, धानाला ५०० रुपये बोनस व साकोली पर्यटनासाठी पाच कोटी रुपयाची मागणी केली. संचालन माजी तालुका अध्यक्ष अ‍ॅड. बापुसाहेब अवचरे यांनी तर आभार माजी सभापती गिताताई कापगते यांनी मानले.यावेळी सभापती धनपाल उंदीरवाडे, जि.प. सदस्य नेपाल रंगारी, दिपक मेंढे, बंडू बोरकर, नईम अली, रवि अग्रवाल, किशोर पोगडे, नितीन खेडीकर, भरत खंडाईत, तालुका अध्यक्ष रमेश खेडीकर, शंकर राऊत, माजी सभापती गिता कापगते उपस्थित होते.