भेलचे काम तत्काळ सुरू करा-मागणी

0
7

साकोली दि. १६: भेल प्रकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करून बेरोजगारांना रोजगार द्या, असे निवेदन मुंडीपार येथील तरूणांनी केंद्रीय भारी अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत निवेदन दिले आहे.

या निवेदनानुसार साकोली तालुक्यातील मुंडीपार सडक, बाम्हणी, खैरी या तीन गावातील शेतकऱ्यांनी आपली जमिनी भुसंपादित केली. मुलांना रोजगार उपलब्ध होईल, आपल्या जिल्ह्याचा विकास होईल याकरीता ५०० एकर जागा भेल प्रकल्पाला दिली. भेल प्रकल्पामध्ये हेवी फेब्रीकेशन प्लॉट आणि सौर उर्जा प्लेट असे दोन विभाग आहेत.

महाराष्ट्र शासनाने २ हजार ७३१ कोटी अनुदान देवूनही हा प्रकल्प सुरू झाला नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी भुसंपादीत झाल्यानंतर तीन वर्षात प्रकल्प पूर्ण होईल. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना आम्ही भेल प्रकल्पामध्ये प्राधान्य देवून रोजगार उपलब्ध करून देवू, असे आश्वासन देवून त्यांच्यावर विश्वासघात झाला. याला जबाबदार कोण, प्रकल्पामध्ये तांत्रिक आणि इतर क्षेत्रात रोजगाराची भरपूर संधी आहे. प्रकल्प ठराविक काळात पूर्ण झाला नाही त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारावर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्रात आणि राज्यात विदर्भाचे एवढे मंत्री असूनही आतापर्यंत एकाही मंत्र्याने भेल प्रकल्पाला भेट दिली नाही. ठराविक काळात प्रकल्प पूर्ण झाला नसल्यामुळे रोजगार उपलब्ध झाला नाही. मागासलेल्या भंडारा जिल्ह्याच्या विकास आराखड्यात भेल प्रकल्पाला प्राथमिकता देवून जिल्ह्याच्या विकासाला गती प्रदान करावी, आम्ही आपणास विनंतीपुर्वक अर्ज सादर करतो की सौर उर्जा मंत्रालयाशी सौर प्लेट तयार करणाऱ्या सौर प्रकल्पाचे ४० टक्के अनुदान मिळाल्यामुळे काम बंद आहे. एकीकडे सरकार परदेशी गुंतवणुकदारांना देशामध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करते आणि देशातील पहिला सौर उर्जा प्लेट तयार करणाऱ्या प्रकल्पाचे ४० टक्के अनुदान थांबवून ठेवले. शासनाने भेल प्रकल्पाचे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आले. निवेदन देतेवेळी राहुल रंगारी, विकास शेंडे, सतीश मेनपाळे, सचिन दुरूगकर, सोनु शेंडे, इम्रान शेख, जयगोपाल भाजीपाले, छबीलाल राऊत, मिथून खोब्रागडे, श्रीकांत नंदेश्वर, विनायक शेंडे, योगेश ठवकर, देवानंद लांडगे, विकास शेडमाके, अमोल मोटघरे, भूषण गोमासे, सुनिल वाघाडे, राजु मते उपस्थित होते.