राजेंद्र जैन :स्वच्छ गोंदिया, स्वच्छ प्रशासन देऊ

0
7

नगराध्यक्षपद व नगरसेवकपदाच्या उमेदवारांची बैठक

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी अशोक (गप्पू) गुप्ता तथा शहरातील सर्व वार्डांमध्ये आपले उमेदवार गोंदिया शहराचा विकास व स्वच्छ गोंदिया तथा स्वच्छ प्रशासन देण्याच्या उद्देशाने निवडणुकीत उभे केले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन माजी विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन यांनी केले. नगर परिषद निवडणुकीत अध्यक्ष पदाचे उमेदवार तथा प्रभागातील उमेदवारांच्या बैठकीत ते बोलत होते.

जैन म्हणाले, गोंदिया शहरातील जनता खा. प्रफुल्ल पटेल यांच्या विकासाच्या धारणेला बळ देईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक गुप्ता तथा नगर सेवकांच्या पदाचे उमेदवारांना बहुमताने विजयी करून गोंदिया नगर परिषदेची सत्ता भाजपच्या सध्याच्या भ्रष्टाचारी तत्वांकडून काढून राष्ट्रवादी काँग्रेसला सोपवावी, असे उद्गार राजेंद्र जैन यांनी काढले.

जैन म्हणाले, काँग्रेस पूर्णपणे भाजपाला मदत करते. देशात काँग्रेस-भाजपचे खुले युद्ध सुरू आहे. परंतु गोंदिया एक असा जिल्हा आहे ज्यात काँग्रेस भाजपचे गटबंधन झाले आहे. जनतेसमोर भाजपसह काँग्रेससुद्धा बेपर्दा होत आहे. शहरातील वातावरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात आहे. निश्चितच शहरातील जनता राष्ट्रवादी काँग्रेसला गोंदिया नगर परिषदेची सत्ता सोपवेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

जैन यांनी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकजुट होवून निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी शहर अध्यक्ष शिव शर्मा यांनी सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पक्षात कार्य करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर परिषदेच्या अध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक गुप्ता म्हणाले, शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस असा एकच पक्ष आहे जो स्वच्छ प्रशासन देवून शहराला विकासाकडे नेवू शकतो. नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी जास्तीत जास्त नगर सेवक निवडून यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी बहुजन समाज पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले मामा बन्सोड यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात झालेल्या विकासाची प्रसंशा केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. जिल्हा अध्यक्ष विनोद हरिणखेडे यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करीत म्हणाले, या निवडणुकीत पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना माफ करणार नाही, अशा लोकांवर पक्षाची नजर असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. कार्यकर्त्यांनी पूर्ण समर्पित होवून राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले.

सभेचे संचालन करीत जिल्हा प्रवक्ता अशोक शहारे यांनी, पक्षाच्या उमेदवारांविरूद्ध पक्षाचे निर्दलीय उमेदवार बनून रिंगणात उतरलेल्या तत्वांना सतेच केले. ते म्हणाले की, त्यांनी तात्काळ आपले नामांकन परत घ्यावे अन्यथा त्यांना पक्षातून निष्कासित करण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. या वेळी मंचावर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह प्रभागातील उमेदवारही उपस्थित होते. सर्वांनी आपापला परिचय दिला.

याप्रसंगी प्रामुख्याने माजी आ. राजेंद्र जैन, विनोद हरिणखेडे, शिव शर्मा, अशोक गुप्ता, अशोक शहारे, लव धोटे, देवेंद्रनाथ चौबे, आशा पाटील, सुशीला भालेराव, केतन तुरकर, प्रतिक भालेराव, लवली होरा उपस्थित होते. भाजपचे अभय अग्रवाल, संदीप पटले, बसपाचे मामा बन्सोड तथा सोनू दास यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा राजेंद्र जैन यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. आभार केतन तुरकर यांनी मानले.