समाज भवनाचा लवकरच कायाकल्प करणार- मनिष चैरागडे

0
15

क्षत्रिय मरठा कलार समाज परिचय संमेलन संपन्न
गोंदिया दि.22- – क्षत्रिय मरठा कलार समाज भवनाला खासदार नाना पटोले यांच्या निधीतून 20 लाख रूपये मंजूर झाले आहेत त्यानिधीतून समाज भवनाचा कायाकल्प करून याला शहरातील इतर लाॅन वा समाजभवना सारखा सुशोभित व सुसज्जित करण्याचा आमचा प्रयत्न असून पुढील एक दोन वर्षात हे दिसून येणार असल्याचे मत क्षत्रिय मरठा कलार समाजाचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष मनिष चैरागडे यांनी व्यक्त केले. क्षत्रिय मरठा कलार समाज द्वारे नुकतेच आयोजित मिलन समारोह व युवक-युवती परिचय संमेलन कार्यक्रमात बोलतांनी त्यांनी समाजबांधवांना आश्वस्त केले. कार्यक्रमाची सुरूवात भगवान सहस्त्रबाहु यांच्या प्रतिमेला पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. समाजातील इंजिनियर्स व अधिकारी यांच्या सौजन्याने आयोजित या मिलन समारोह व युवक-युवती परिचय संमेलन दरम्यान समाज बांधवाकरिता विविध स्पर्धेचे आयेाजन करण्यात आले होते. यात रांगोळी स्पर्धा व समाजातील गुणवंत विद्याथ्र्यांचा प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. व समाज भवनाकरिता विविध मदत करणा-यांचा आभार ही करण्यात आला. या प्रसंगी समाजातील 56 युवक-युवतींची नांेदणी करण्यात आली. व यावर्षी चा समाजाचा सामूहिक विवाह 29 एप्रिल 2017 ला करण्यात येण्याची घोषणा करण्यात आली. अध्यक्ष मनिष चैरागडे यांचे द्वारे आपल्या वडीलांच्या स्मृतीत समाजातील एक दिव्यांग मुलीला टायसिकल देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांचे प्रास्ताविक सचिव शरद डोहरे यांनी करित गेल्या सहा महिण्याचा आपल्या कार्यकाळाचा आढावा व पुढील नविन कार्यक्रमाचा आढावा समाजापुढे मांडला. या प्रसंगी माधोसाव भोयर, दामोदर दियेवार, पालकचंद सेवईवार, नंदकिशोर भोयर, सुरेश चैरागडे, भागवत धपाडे, महेंद्र डोहळे, चक्रधर कावळे, गोपाल बिजेवार, बिनाराम चैरागडे, टिकाराम बारेवार,उपाध्यक्ष निलकंठ सिरसाटे, नारायण कावळे, राजकुमार धुवारे, राजेंद्र डहाके, धर्मेन्द्र धपाडे, चमन बिसेन, मनोज डोहरे, दिलीप धपाडे, माणिक बिजेवार, अरविंद धपाडे, लोकेश भोयर, अमरदास डहाके, महाप्रकाश बिजेवार, किरण पालेवार, यशवंत कावळे आदि सह हजारोंच्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते.