न.पं.कर्मचाऱ्याचे कामबंद आंदोलन

0
9

गोरेगाव,दि.24-: अनेक वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कायमस्वरुपी समावेशन व वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय कामबंद आंदोलन केले.

गोरेगाव ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रुपांतर झाले, मात्र २२ महिन्यांचा कालावधी लोटूनही कर्मचाऱ्यांचा समावेशन करण्यात आला नाही. नगर पंचायतमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याव्ांर कामाचा अतिरिक्त भार वाढलेला आहे. मिळणारे वेतन मात्र तुटपुंजे आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.

शासन निर्णय नगर विकास विभाग क्र.एमडीओ २०१५/प्र.क्र.१३९/भाग १/नवी १४ दि.०५ जुलै २०१६ अन्वये नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आलेली आहे. आदेश निर्मिती झालेल्या दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश आहे. पण ६ महिन्यांचा कालावधी लोटूनही आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय आंदोलन केले.