नगराध्यक्षपदाचे बहुतांश उमेदवार थकित

0
8

गोंदिया नगरपरिषद निवडणूक उमेदवारांनी दिली शपथपत्रात माहिती
गोंदिया,दि.२ : गोंदिया नगर परिषद क्षेत्रातून नगराध्यक्ष पदाकरीता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी आपले शपथपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केले आहे. त्याबाबतची माहिती पुढील प्रमाणे. छैलबिहारी अग्रवाल शिक्षण- बी.कॉम.पार्ट-१, जंगम मालमत्ता- ११ लाख ३३ हजार ९८६ रु., स्थावर मालमत्ता- ८० लाख रु., थकित- १० हजार ७१० रु., अशोक इंगळे शिक्षण- बी.ए., जंगम मालमत्ता – ४ लाख ६९ हजार ५३ रु., स्थावर मालमत्ता- ४० लाख रु., थकित- ४७ हजार ६०४ रु., ज्योती उमरे शिक्षण- १० वी, जंगम मालमत्ता – २१ लाख ५ हजार रु., स्थावर मालमत्ता- ३ लाख ५० हजार रु., थकित- ६ लाख १४ हजार ४७८ रु., सुरेंद्र खोब्रागडे शिक्षण- एम.ए., जंगम मालमत्ता – १ लाख ३० हजार २१२ रु., स्थावर मालमत्ता- ६ लाख रु., थकित- निरंक, अशोक गुप्ता शिक्षण- १२ वी, जंगम मालमत्ता – ८० लाख ९४ हजार ३७९ रु., स्थावर मालमत्ता- १ लाख ५३ हजार रु., थकित- ७१ लाख ५२ हजार ८२७ रु., गोवर्धन जयस्वाल शिक्षण- बी.एस्सी., जंगम मालमत्ता – ६१ हजार रु., स्थावर मालमत्ता- निरंक, थकित- ४०० रु., राकेशसिंह ठाकुर शिक्षण- बी.एस्सी., जंगम मालमत्ता- ११ लाख ८९ हजार ५३१ रु., स्थावर मालमत्ता- ३० लाख रु., थकित- निरंक, नरेंद्र तिवारी शिक्षण- तिसरी, जंगम मालमत्ता- २ लाख ३४ हजार रु., स्थावर मालमत्ता- निरंक , थकित- निरंक, सतीश बंसोड शिक्षण- एम.ए., जंगम मालमत्ता – २३ लाख ७२ हजार ६७७ रु., स्थावर मालमत्ता- १५ लाख रु., थकित- ४३ हजार रु., किशोर भोयर शिक्षण- आठवी, जंगम मालमत्ता- ९ लाख १ हजार ८०० रु., स्थावर मालमत्ता- ८० हजार रु., थकित- ४८९ रु., हरिराम मोटवानी शिक्षण- १० वी, जंगम मालमत्ता- २२ लाख ९३९ रु., स्थावर मालमत्ता- २१ लाख ६१ हजार ७२२ रु., थकित- १ हजार ६१५ रु., पुरुषोत्तम मोदी शिक्षण- बी.कॉम., जंगम मालमत्ता- ३९ लाख ३५ हजार १६२ रु., स्थावर मालमत्ता- १९ लाख ५३ हजार रु., थकित- २२ लाख १३ हजार १२४ रु., पंकज यादव शिक्षण- १२ वी, जंगम मालमत्ता- ८२ लाख ५९ हजार ७११ रु., स्थावर मालमत्ता- निरंक, थकित- १४ लाख ३९ हजार ५० रु., दुर्गेश्वरकुमार रहांगडाले शिक्षण- १२ वी, जंगम मालमत्ता- ४८ लाख २१ हजार ४१६ रु., स्थावर मालमत्ता- निरंक, थकित- १ लाख ३ हजार १२४ रु. इतके आहे. अशाप्रकारची माहिती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केली आहे.