सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त डिजीटल इंडिया कार्यशाळा

0
9

गोंदिया,दि.२ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी हा जन्मदिवस भारतीय स्त्री मुक्ती दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या वतीने यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात सकाळी ११.३० वाजता डिजीटल इंडिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार हे करतील. अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ हे असतील. प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची, प्रमुख वक्त्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर तर मार्गदर्शक म्हणून जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिल श्रीवास्तव, नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक श्री.जागरे हे उपस्थित राहणार आहे.
या कार्यशाळेत इंटरनेट साथी म्हणून काम करीत असलेल्या बचतगटातील १०० महिलांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी दिली.