सायकल रैली काढून केली र्इंधन बचतीसाठी जनजागृती

0
12

– ‘सक्षमङ्क उपक्रमातंर्गत आयोजन
– नगराध्यक्ष इंगळे यांनी केला शुभारंभ
गोंदिया,berartimes.com दि.०५-केंद्र शासनाच्या पेट्रोलिमयम संरक्षण अनुसंधान संघ (पीसीआरए) तर्फे राबविण्यात येणाèया ‘सक्षम -२०१७ङ्क या उपक्रमांतर्गत येथील एलपीजी वितरकांच्या माध्यमातून विविध संघठना व शहरवासियांच्या वतीने आज, ५ फेब्रुवारी रोजी शहरातून सायकल रैली काढून र्इंधन बचतीसह पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर या रैलीतून स्वच्छतेचही संदेश देण्यात आले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोक इंगले यांनी झेंडी दाखवून या रैलीचे शुभारंभ केले.
र्इंधनाची बचत करता यावी, यासह पर्यावरणाचा होत असलेला èहास थांबावा तर स्वच्छताही राखता यावी यासाठी केंद्र शासनाच्या पेट्रोलिमयम संरक्षण अनुसंधान संघातर्फे संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम) हे उपक्रम राबविण्यात येत आहे. दरम्यान शहरातही याविषयी माहिती व्हावी व शहरवासियांमध्ये जागृती व्हावी यासाठी स्थानिक एलपीजी वितरकांच्या माध्यमातून विविध सामाजिक संघटना, सेवाभावी संस्थांच्या वतीने आज, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता येथील जयस्तंभ चौक येथून रैलीचे आयोजन करण्यात आले होते. या रैलीचे शुभारंभ नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी केले. याप्रंसगी र्इंधनाची बचत व पर्यावरणाचे संतूलन राखून स्वच्छता ठेवण्यासंबंधीची उपस्थितांनी शपथ घेतली. दरम्यान शहरातील विविध भागातून सायकल रैलीने भ्रमण केले. या रैलीचे समापन गांधी प्रतिमा चौकात करण्यात आले. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी धावक मुन्नालाल यादव, देवेश मिश्रा, जयंत शुक्ला, मोहन पवार, सुनील तिवारी, अहमद मनियार, सचिन चौरसिया, संजय दुबे, गुड्डा द्विवेदी, विजय कावळे, अजय श्यामका, रमेश ढोमणे, अरमान भीगे, यादोराव कोहले, महेश शेंद्रे, सुनील नेवारे, राकेश नेवारे, हंसराज राऊत, प्रणाली नेवारे, मयूरी निर्मलकर, प्रिती कोरे आदि युवक-युवती, बालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान र्इंधन बचत, पर्यावरण संतूलन व स्वच्छता ठेवण्यासाठी दर रविवारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक एलपीजी वितरक पुष्पक जसानी, नीलेश कोठारी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करताना दिली.