गडचिरोली जिल्हा परिषदेत २० जागा जिंकून भाजप ठरला सर्वांत मोठा पक्ष

0
23

गडचिरोली, दि.२३: येथील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने अपेक्षित आकडेवारी गाठत २० जागा जिंकल्या, तर १५ जागा जिंकून काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. माजी आमदार दीपक आत्राम यांच्या नेतृत्वातील आदिवासी विद्यार्थी संघाने ७ जागा जिंकून मोठी बाजी मारली, तर माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसची घोडदौड केवळ ५ जागांवर थांबली. या निवडणुकीत अपक्ष व लोहखानींच्या विरोधात आंदोलन उभारणाऱ्या ग्रामसभांनी प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळविला.
चामोर्शी तालुक्यात आ.डॉ.देवराव होळी,तर देसाईगंज तालुक्यात आ.क्रिष्णा गजबे यांच्या नेतृत्वात भाजपने नेत्रदीपक कामगिरी केली. २०१२ च्या तुलनेत भाजपने यंदा १२ जागा अधिकच्या जिंकल्या आहेत. काँग्रेसने आ.विजय वडेट्टीवार व जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात लक्षवेधी कामगिरी केली. काँग्रेसने मागच्या तुलनेत एक जागा वाढविली आहे.मात्र शिवसेनेला एकही जागा राखता आली नाही.
देसाईगंज तालुक्यातील जि.प.क्षेत्राच्या सर्व तिन्ही जागा जिंकून भाजपने काँग्रेस व शिवसेनेला चारीमुंड्या चीत केले.कोरेगाव डोंगरगांव- रमाकांत नामदेव ठेंगरे ३६३६ (भाजप) विजयी झाले. त्यांनी परसराम टीकले ३५५७(कांग्रेस) यांचा पराभव केला. विसोरा सावंगी क्षेत्रातून- भाजपचे कोदंडधारी(नाना) धनंजय नाकाडे ३८८२ जिंकवले. त्यांनी जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष जीवन नाट २८२४ (कांग्रेस)यांना पराभूत केले. कुरुड़ कोंढाळा क्षेत्रातून भाजपच्या रोशनी सुनील पारधी ४६८७विजयी झाल्या. त्यांनी भारती मिसार ४२३८(कांग्रेस) यांचा पराभव केला.
आरमोरी तालुक्यातील पळसगाव-अरसोडा क्षेत्राची जागा काँग्रेसच्या मनिषा मधुकर दोनाडकर(४०७३) यांनी जिंकली. त्यांनी शिवसेनेच्या लक्ष्मी हरीश मने-३५६० यांचा पराभव केला. ठाणेगाव-इंजेवारी क्षेत्रातून भाजपच्या मितलेश्वरी जयंत खोब्रागडे-३९७८ विजयी झाल्या. त्यांनी आशा गणेश शेंडे-२४५३(काँग्रेस) यांचा पराभव केला. वैरागड-मानापूर क्षेत्रातून भाजपचे संपत आळे-४०५४ निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे केशवराव तुळशीराम गेडाम-(३०४९) यांना पराभूत केले. वडधा-सिर्सी क्षेत्रातून काँग्रेसच्या वनिता सहाकाटे विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या गीता कंगाले यांचा पराभव केला.
कुरखेडा तालुक्यातील ५ जि.प.क्षेत्रांपैकी भाजपने ३, तर काँग्रेसने २ जागा जिंकल्या. पलसगड-पुराडा क्षेत्रातून काँग्रेसचे प्रभाकर तुलावी विजयी झाले. तळेगाव-वडेगाव क्षेत्रातून भाजपचे नाजुकराव पुराम निवडून आले. गेवर्धा-गोठणगाव क्षेत्रातून काँग्रेसचे प्रल्हाद कराडे विजयी झाले. कढोली-सावलखेडा क्षेत्रातून भाजपचे भाग्यवान टेकाम निवडून आले. अंगारा-येंगलखेडा क्षेत्रातून भाजपच्या गीता सुनील कुमरे विजयी झाल्या.
कोरची तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषद क्षेत्रांमधून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. कोटरा-बिहिटेकला जिल्हा परिषद क्षेत्रातून काँग्रेसचे अनिल(क्रांती) केरामी १२१ मते घेऊन विजयी झाले. बेळगाव-कोटगूल क्षेत्रातून काँग्रेसच्या सुमित्रा लोहंबरे २५७९ मते घेऊन निवडून आल्या.
गडचिरोली तालुक्यातील ५ जागांपैकी काँग्रेसने २, तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षांनी प्रत्येकी १ जागा जिंकली. मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातून भाजपच्या नीता निळकंठ साखरे निवडून आल्या. वसा-पोर्ला क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जगन्नाथ बोरकुटे विजयी झाले. त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व रासपच्या चिन्हावर निवडणूक लढलेले बंडोपंत मल्लेलवार तसेच भाजपचे विद्यमान जि.प.सदस्य प्रशांत वाघरे यांचा पराभव केला. कोटगल-मुरखळा क्षेत्रातून अपक्ष उमेदवार वर्षा दिलिप कौशीक विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या ममता दुधबावरे यांच्यावर मात केली. जेप्रा-विहीरगाव क्षेत्रात काँग्रेसचे अॅड.राम मेश्राम विजयी झाले. त्यांनी भाजपचे दिवाकर बारसागडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वास भोवते यांना पराभूत केले. सर्वांचे लक्ष लागलेल्या मुडझा-येवली क्षेत्रातून काँग्रेसच्या वैशाली किरण ताटपल्लीवार विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनच्या विद्यमान सदस्या छाया कुंभारे व भाजप नेत्या रेखा डोळस यांचा पराभव केला.
धानोरा तालुक्यातील ४ जागांपैकी काँग्रेसने ३, तर भाजपने १ जागा जिंकली. मुस्का-मुरुमगाव क्षेत्रातून भाजपच्या लता पुंघाटे निवडून आल्या. येरकड-रांगी क्षेत्रातून काँग्रेसचे मनोहर पोरेटी विजयी झाले. चातगाव-रांगी क्षेत्रातून काँग्रेसचे अजिज जिवानी विजयी झाले. त्यांनी भाजपचे दिग्गज उमेदवार शशिकांत साळवे यांचा पराभव केला. पेंढरी-गट्टा क्षेत्रातून काँग्रेसचे श्रीनिवास दुल्लमवार निवडून आले. त्यांनी भाजपचे हेवीवेट उमेदवार अरुण हरडे यांना पराभूत केले.
मुलचेरा तालुक्यातील ३ जागांपैकी काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी १ जागा जिंकली. कालीनगर-विवेकानंदपूर जि.प. क्षेत्र- राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार युधिष्टिर बिश्वास ४९१ मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपचे दिग्गज उमेदवार व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार यांना पराभूत केले, सुंदरनगर-गोमणी- काँग्रेसचे उमेदवार रवींद्र शहा ५५७ मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांचा पराभव केला. कोठारी-शांतिग्राम मधून भाजपच्या उमेदवार माधुरी संतोष उरते ३१४ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार तनुश्री आत्राम यांना पराभूत केले. तनुश्री आत्राम ह्या माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कनिष्ठ कन्या होत,
अहेरी तालुक्यातील ६ जिल्हा परिषद क्षेत्रांपैकी आदिवासी विद्यार्थी संघाने ४, तर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने प्रत्येकी एक जागा जिंकली. आलापल्ली-वेलगूर क्षेत्रातून विद्यमान कृषी सभापती व आविसंचे नेते अजय कंकडालवार विजयी झाले.
रेपनपल्ली-उमानूर जिल्हा परिषद क्षेत्र- आदिवासी विद्यार्थी संघाचे उमेदवार अजय नैताम ५०० मतांनी विजयी झाले. जिमलगट्टा-पेठा क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ऋ्षी पोरतेट निवडून आले. पेरमिली जिल्हा परिषद क्षेत्रातून मनिषा बोड्डाजी गावडे १६५४ मतांनी विजयी झाल्या. महागाव-देवलमरी जिल्हा परिषद क्षेत्रातून आदिवासी विद्यार्थी संघाच्या अनिता दीपक आत्राम १०३ विजयी झाल्या. खमनचेरु-नागेपल्ली क्षेत्रातून आदिवासी विद्यार्थी संघाच्या उमेदवार सुनीता कुसनाके २५२४ मतांनी विजयी झाल्या.
सिरोंचा तालुक्यातील ४ जिल्हा परिषद क्षेत्रांपैकी आदिवासी विद्यार्थी संघाने २, तर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने प्रत्येकी एक जागा जिंकली. जाफ्राबाद-विठ्ठलरावपेठा जिल्हा परिषद क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार भाग्यश्री धर्मरावबाबा आत्राम ३१२७ मते घेऊन विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या कमला सदाशिव गेडाम यांचा पराभव केला. कमला गेडाम यांना १६१३ मते मिळाली. झिंगानूर-असरअली क्षेत्रातून आविसंच्या सरिता रमेश तैनेनी २१८९ मते घेऊन निवडून आल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली दामोधर सिडाम(१७७३)यांचा पराभव केला.नारायणपूर-जानमपल्ली आविसंच्या जयसुधा बानय्या जनगम ६९५ मतांनी निवडून आल्या.. अंकिसा-लक्ष्मीदेवीपेठा क्षेत्रातून भाजपच्या श्रीदेवी जयराम पांडवला ३०८ मतांनी विजयी झाल्या.
एटापल्ली तालुक्यातील चार जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये काँग्रेस, भाजप, आविसं व ग्रामसभांनी प्रत्येकी १ जागा जिंकली. तेथील गट्टा-पुरसलगोंदी जिल्हा परिषद क्षेत्रातून ग्रामसभांनी उभे केलेले उमेदवार सैनू गोटा २०१४ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू नरोटी(१५४५) यांचा पराभव केला. जारावंडी-कसनसूर क्षेत्रात काँग्रेसचे संजय चरडुके १५२५ मते घेऊन निवडून आले. त्यांनी भाजपचे संजय पोहनेकर(१२२३)यांना पराभूत केले. हालेवारा-गेदा क्षेत्रातून भाजपच्या कल्पना आत्राम(२१७४) विजयी झाल्या. त्यांनी आविसंच्या मनिषा रापंजी(२००१) यांचा पराभव केला. उडेरा-गुरुपल्ली क्षेत्रातून आविसंच्या सारिका आईलवार(१७१७) निवडून आल्या. त्यांनी रागिनी अडगोपुलवार(१४७६)यांना पराभूत केले.
भामरागड तालुक्यातील भामरागड-नेलगुंडा क्षेत्रातून ग्रामसभांचे उमेदवार अॅड.लालसू नरोटे विजयी झाले. कोठी-मन्नेराजाराम क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्ञानकुमारी टांगरु कौशी निवडून आल्या. या तालुक्यात पंचायत समितीच्या तीन जागा ग्रामसभांच्या उमेदवारांनी जिंकल्या.

चामोर्शी तालुक्यातील ९ जागांपैकी भाजपने ६ जागा जिंकल्या. तेथे काँग्रेसला २ तर एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली. कुनघाडा-तळोधी क्षेत्रातून भाजपचे रमेश बारसागडे विजयी झाले. विसापूर रै-कुरुड क्षेत्रातून भाजपच्या योगीता भांडेकर विजयी झाल्या. विक्रमपूर-फराडा क्षेत्रातून भाजपच्या विद्या आभारे निवडून आल्या. भेंडाळा-मुरखळा क्षेत्रातून काँग्रेसच्या कविता प्रमोद भगत विजयी झाल्या. लखमापूर बोरी-गणपूर क्षेत्रातून रासप समर्थित अपक्ष उमेदवार व जिल्हा परिषदेचे विद्यमान बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार निवडून आले. त्यांनी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे यांचा पराभव केला. हळदवाही-रेगडी क्षेत्रातून भाजपच्या मीना कोडाप निवडून आल्या. घोट-सुभाषग्राम क्षेत्रातून भाजपचे नामदेव सोनटक्के विजयी झाले. बहुचर्चित दुर्गापूर-वायगाव क्षेत्रातून शिल्पा धर्मराज रॉय निवडून आल्या. तसेच आष्टी-इल्लूर क्षेत्रातून काँग्रेसच्या रुपाली संजय पंदिलवार विजयी झाल्या. त्यांनी जि.प.च्या माजी सभापती भाजपच्या उमेदवार अंजली रवींद्र ओल्लालवार यांचा पराभव केला.