पदोन्नतीला घेऊन आरोग्य कर्मचाèयांचे जि.प.समोर आंदोलन

0
8

गोंदिया,दि.२२(berartimes.com)- गोंदिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्गंत येणाèया सर्व आरोग्य कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या दुटप्पीधोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी आज बुधवारला (दि.२२)एकदिवसीय धरणे आंदोलन केले.या आंदोलनात महाराष्ट्र राज्य नर्सेस संघटना जिल्हा शाखा गोंदिया,महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटना व विस्तार अधिकारी संघटना सहभागी झाली आहे.सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जाणीवपुर्वक त्रास देण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाèयांचे पदोन्नतीप्रकरण थांबवून ठेवून अन्याय केल्याचे आंदोलनकर्ते कर्मचारी व नर्सेस यांचे म्हणने आहे.जेव्हा की,सर्व विभागाचे २०१५ च्या बिंदूंनामावली नुसार पदोन्नती प्रकिया पार पाडून पदोन्नती देण्यात आली.फक्त आरोग्य विभागाला वगळण्यात आले.यावरुन सामान्य प्रशासन विभाग आरोग्य विभागाशी सापत्न वागणूक करीत असल्याचे आंदोलकांचे म्हणने आहे. आंदोलनात कालबद्ध रखडलेल्या पदोन्नती करण्यात यावे.१६ वर्षापासून बिंदू नामावली तयार नसल्यामुळे विस्तार अधिकारी या पदाची पदोन्नती झालेली नाही,ती त्वरीत करण्यात यावी.नियमित पगार करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.