७४८ खासगी डॉक्टर संपावर: डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध

0
5

चंद्रपूर दि.२४: डॉक्टरांवर होणाऱ्या हल्यांच्या घटनांचा निषेध नोंदवित इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर व महाराष्ट्रने गुरुवार २३ मार्चपासून संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील ७४८ डॉक्टर सहभागी झाले असून गुरूवारी अनेक शहर व गावांतील आरोग्य प्रभावित झाल्याचे दिसून आले.आयएमए हॉल चंद्रपूर येथे गुरूवारी सकाळी ११ वाजता झालेल्या बैठकीत संप करण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. यावेळी डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी त्यावरील उपाययोजना व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सादर करण्यात आले.
निवासी जिल्हाधिकारी संजय धिवरे, पोलीस अधीक्षक संदिप दिवाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. प्रमोद बांगडे, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. गोपाल मुंधडा, डॉ. अशोक भुक्ते, डॉ. दीपक निलावार, डॉ. मंगेश टिपणीस, डॉ. के.बी. मेहरा, डॉ. सुनील संघई, डॉ. शर्मिली पोद्दार, डॉ. पल्लवी इंगळे, डॉ. नसरीन मावानी, डॉ. प्रियदर्शन मुठाळ, डॉ. जगदीश अग्रवाल, डॉ. रवी अलुरवार, डॉ. विवेक करमरकर, डॉ. विवेक शिंदे, डॉ. किशोर धांडे, डॉ. सचिन सरदेशपांडे, डॉ. किर्ती साने, डॉ. रेखा दांडेकर, डॉ. महेश भांडेकर, डॉ. मुंधडा यांच्यासह इंडियन मेडीकल असोसिएशन व इंडियन डेन्टल असोसिएशनचे डॉक्टर सदस्य उपस्थित होते.